HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांना १०० दिवस ED कस्टडी अन् जेलमध्ये रहावे लागेल- किरीट सोमय्या

मुंबई। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर आता विरोधकांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. ईडी चौकशी प्रकरणात अनिल देशमुखांपाठोपाठ कुणाचा नंबर याबाबतची नावेच किरीट सोमय्यांनी यांनी प्रसिद्ध केले आहे. किरीट सोमय्यांनी एक ट्विट करत अनिल देशमुखांपाठोपाठ आणखी दोन मंत्र्यांची नावे आपल्या ट्विटमध्ये जाहीर केली आहेत. आणखी कोणाला ईडी चौकशीला यावे लागेल याचा खुलासा ट्विटच्या माध्यमातून किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्यांनी यांनी १०० दिवस ईडीच्या कस्टडीत, जेलमध्ये रहावे लागेल, असा दावा केला आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या?

आखिर अनिल देशमुखला ईडी कार्यालयात यावे लागले, 100 दिवस ईडीच्या कस्टडीत, जेल मध्ये रहावे लागणार. दर महिन्याचा 100 कोटींच्या वसुलीचा हिशोब द्यावा लागणार. शरद पवारकडे दर महिन्याला किती? उद्धव ठाकरेना किती ? पहिली अटक जितेंद्र आव्हाडांची झाली आता अनिल देशमुखची होणार आणि पुढे अनिल परब

दोनदा मी त्यांच्या कार्यालायत जाऊन स्टेटमेटं दिलं

उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जात आहे. चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मला जेव्हा ईडीचा समन्स आला. तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही अशा चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मला जेव्हा जेव्हा समन्स आला तेव्हा मी ईडीला माझी याचिका कोर्टात आहे. त्याची सुनावणी सुरू आहे असं सांगतानाच मी सुप्रीम कोर्टातही याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आल्यावर मी स्वत: ईडीच्या कार्यालयात येईल असं सांगितलं होतं. आमच्या सर्व घरावर छापे मारले. आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं. सीबीआयने दोनदा समन्स दिलं. दोनदा मी त्यांच्या कार्यालायत जाऊन स्टेटमेटं दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परदेश शिष्यवृत्तीसाठी आता ६ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा

News Desk

आमचा उमेदवार हरला तरी पर्वा नाही ! पोटनिवडणुकीबाबत फडणवीसांंचं मोठं विधान

News Desk

हिंगणघाट जळीत कांड : आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल !

swarit