HW News Marathi
महाराष्ट्र

पालखीच्या प्रवासासाठी आकारण्यात आलेले शुल्क तात्काळ परत करण्याचे आणि चौकशीचे आदेश – अनिल परब

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची वारी वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी एसटी महामंळाकडून विशेष बसने या पालख्या पंढरपूरला पोहोचल्या. दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे ७१ हजार रुपयांचे तिकीट एसटी महामंडळाने फाडले होते. त्यामुळे लोकसहभागातून कसलाही खर्च न होता होणारी निवृत्तीनाथांची पायी वारी यावर्षी मात्र सशुल्क करावी लागली.

शासनाने विनामूल्य बस उपलब्ध करून देण्यास असमर्थता दाखविल्याने परिवहन महामंडळाची असंवेदनशील कामगिरी जनतेसमोर समोर आली. आणि यामुळे विरोधी पक्षाकडून महाविकासआघाडी वर ताशेरे ओढण्यात आले.

यावेळी, राज्याचे परिवहन मंत्री यांनी अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.आम्ही २-३ वेळा पत्र देऊन शासनानेच स्वखर्चाने शिवशाही बस उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली होती. परंतु दोन-तीन बैठकांमध्ये महामंडळाने त्याबाबत असमर्थता दर्शविली. त्यानंतर अखेर संस्थानने प्रवासभाडे भरले असल्याचे निवृत्तीनाथ संस्थानकडून सांगण्यात आले होते.

यावर, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदा महाराष्ट्रात आषाढी वारी होऊ शकली नाही परंतु पालखी नेण्याचा बहुमान यंदा एसटीला मिळाला. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या यांच्या पालखी संदर्भात झालेली घटना ही दुर्दैवी असून गैरसमजातून घडली आहे, असे अनिल परब यांनी ट्विट करत सांगितले. तसेच पालखीच्या प्रवासासाठी आकारण्यात आलेले शुल्क तात्काळ परत करण्याचे आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीच महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला – संजय राऊत

News Desk

नवाब मलिकांचा नवा खुलासा, सांगितलं सॅम डिसूझाचं खरं नाव

News Desk

पुणेकरांनी गव्यास मारले ते पाकिस्तान-चीनच्या चिथावणीमुळेच! सामनातून पुण्यावर टिका करत दानवेंवर निशाणा

News Desk