HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

थोर विधीरत्न राम कदमांना केंद्र आणि राज्य सरकारमधला फरकही कळत नाही!

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलीस आणि मुंबई पोलिसांवर केलेल्या वादग्रस्त टिकेनंतर आता राज्यातील वातावरण तापले आहे. कंगना राणावतवर सर्वच स्तरांतून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशावेळी भाजप आमदार राम कदम हे मात्र कंगनाच्या समर्थनार्थ बोलत आहे. यावर, “थोर विधीरत्न राम कदम यांना केंद्र आणि राज्य सरकारमधला फरक कळत नाही”, असे म्हणत राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी राम कदम यांना बोचरा टोला लगावला आहे. “कंगना रणावतने केंद्राकडे सुरक्षेची मागणी केली आणि राम कदमांनी राज्य सरकारने सुरक्षा का दिली नाही ? असे विचारत ट्वीट केल”, असे म्हणत अनिल परब यांनी राम कदमांवर टीका केली आहे.

“मला केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी, तर मी सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील सर्व सिक्रेट्स केंद्र सरकारकडे देईन, असे ट्वीट अभिनेत्री कंगना रनौतने केले. त्यावर थोर विधीरत्न राम कदम यांना केंद्र आणि राज्य सरकारमधला फरक कळत नाही. त्यांनी(राम कदम) दुसरं ट्वीट केलं, की एवढे तास झाले अजून महाराष्ट्र सरकारने सुरक्षा का दिली नाही. केंद्र शासनाकडे मागितलेली सुरक्षा यावर राज्य शासनाचं उत्तर ? यावरुन राम कदमांचा अभ्यास कळून येतो”, असा बोचरा टोला अनिल परब यांनी राम कदमांना उद्देशून केले आहे.

कंगना राणावतविरोधात शिवसेना मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक यांनी आक्रमपणे कंगनाला इशारा दिलेला आहे. त्यानंतर आता अनिल परब यांनी देखील कंगनाचे समर्थन करणाऱ्या राम कदमांवर निशाणा साधला आहे. शिवसेना भवनाबाहेर महिला कार्यकर्त्यांनी कंगना राणावत विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलनही केले. त्यामुळे, निश्चित राज्यात या प्रकणामुळे राजकारण तापत आहे.

 

Related posts

मोदींची सिंगापुर येथील मुलाखत पुर्णपणे स्क्रिप्टेड | राहुल गांधी

News Desk

अनिल परबांनी आता तरी पराभव मान्य करावा अन् मला काम करू द्यावं, काँग्रेस आमदाराचा खोचक सल्ला

News Desk

दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

News Desk