HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

अनिल परब हाजीर हो …ईडीचं पुन्हा समन्स !

मुंबई |महाराष्ट्राचे परिवहन मंत्री ,शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होत आहे. अनिल परब यांना याआधी ईडीची नोटीस आली होती ,आता पुन्हा एकदा ईडीने परबांना समन्स पाठवलं आहे. अनिल परब यांना येत्या 28 सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास बजावलं आहे.त्यामुळे अनिल परब आता तरी ईडी चौकशी ला उपस्थित राहणार का हे पाहाव लागेल.

परबांना २ वेळा समन्स

अनिल परब यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट
सोमैय्या यांनी आरोप केले होते. यापूर्वी त्यांना 31 ऑगस्ट रोजी समन्स पाठवण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी परब ईडीच्या कार्यालयात गेले नाहीत.त्यांनी नियोजित कार्यक्रमांचं कारण देत जबाब नोंदवण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती. मात्र आता ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावल्याने अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अनिल परबांना समन्स आल्यानंतर संजय राऊत यांनी केल होत ट्विट

” शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू..जय महाराष्ट्र,” असं संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

ईडीची नोटीस नेमकी कशासाठी ?

अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांना ईडीने 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं होतं.

संजय राऊत ट्विटमध्ये काय म्हणाले होते ?

” शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू..जय महाराष्ट्र,” असं संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते.

राणे कनेक्शनमुळे परबांना ईडी?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण तापलं होतं. याच मुद्द्याला घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर निदर्शनं तसेच आंदोलनं केली जात होती. त्यानंतर नारायण राणे यांच्या अटकेचं नाट्य रंगलं. यामध्ये परब पोलिसांना सूचना देत असल्याचा एक व्हिडीओसुद्धा समोर आला होता. परबांच्या या व्हिडीओच्या आधावरच भाजपने त्यांना कोर्टात खेचण्याची भाषा केली होती. तसेच आम्ही या सर्व गोष्टींचा रितसर बदला घेऊ असं राणे बंधू यांनी सूचक विधान केलेलं होतं. या सर्व घडामोडीनंतर आता परब यांना ईडीची नोटीस जारी करण्यात आली आहे. नारायण राणे यांना अटक होण्यामागे परबांची मोठी भूमिका असल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली नाही ना ? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

ईडी नोटीसीवर अनिल परब यांची प्रतिक्रिया

“मला ईडीची नोटीस मिळाली आहे. त्यात कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नोटीस कशासी संबंधित आहे, हे मला सांगता येणार नाही. जोपर्यंत प्रकरण कळत नाही तोपर्यंत काहीही सांगणं कठीण आहे. नोटीसमध्ये फक्त इन्व्हेस्टीगेशनचा पार्ट असल्याचा उल्लेख केला आहे. नोटीसला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. मला कारणं कळली पाहिजे. मी या प्रक्रियेवर कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन ईडी चौकशीला सामोरं जाण्याबद्दल निर्णय घेईन. नोटीस कायदेशीर आलेली आहे त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल. नोटीस मागचं कारण काय हे जेव्हा समजेल तेव्हा आम्ही उत्तर देऊ”, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी ईडी नोटीस मिळाल्यानंतर दिली होती.

 

Related posts

शिवसेनेच्या संपर्कात भापजचे अनेक आमदार, नेते | संजय राऊत

अपर्णा गोतपागर

आता रामदास आठवले कुठे गेले? संजय राऊतांचा सवाल

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट हॅक, बिटकॉईनची केली मागणी

News Desk