HW News Marathi
महाराष्ट्र

“…मग जाचक कायदे होणारच”- अण्णा हजारे

राळेगणसिद्धी | गेल्या आठवड्यात जनआंदोलन समितीने पत्रकार परिषद घेऊन तीन कृषी कायदे, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि देशात सुरू असलेलं सरकारी कंपन्या विकण्याचं धोरण यावर केंद्र सरकारविरुद्ध आवाज उठविण्याचं आवाहन अण्णा हजारेंना केलं होतं. अन्यथा केंद्र सरकार आणि अण्णा हजारेंविरुद्ध राळेगणसिद्धीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज देश बचाव जन आंदोलन समितीचे पदाधिकारी अण्णांना भेटले. यावेळी ऍड. रवींद्र रणसिंग, रवींद्र देशमुख, मारुती भापकर, सागर आल्हाट, दुर्गा भोर, मुकुंद काकडे, ऍड. देविदास शिंदे उपस्थित होते.

आपण आंदोलनं करून लोकहिताचे अनेक कायदे मंजूर करून घेतले. मात्र आता सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर पास करण्यात येत आहे. मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहे. जनताच कुंभकर्णासारखी झोपली. त्यामुळे हे शक्य आहे. आता जनतेने आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजे, तेव्हाच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द करेल, असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्ती केलं. ते देशबचाव जनआंदोलन समितीशी बोलत होते.

मी कधीपर्यंत लढू

यावेळी अण्णा म्हणाले की, माझ वय ८४ वर्षे आहे. मी कधीपर्यंत लढू, देश बचाव जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही लढा उभा करा, मी तुमच्यासोबत आवश्य येईल. मात्र त्याचवेळी देशात सरकारकडून मागणी नसताना लादण्यात येत असलेल्या कायद्यांवर, सरकारी कंपन्या विकण्याच्या धोरणांवर अण्णांनी खंत व्यक्त केली. देशातील जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे. ही जनता जोपर्यंत जागी होत नाही आणि सरकार बदलण्याची ताकद उभी करत नाही, तोपर्यंत सरकार झुकणार नाही. असेच कायदे आणि निर्णय लादण्यात येतील, असंही अण्णांनी म्हटलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“त्यांना अक्कलेचे धडे मिळाले”, नाव न घेता नारायण राणेंचा अजित पवारांना टोला

Aprna

सोनई हत्याकांडातील 6 दोषींना फाशीची

swarit

अमृता यांना विरोधक लक्ष्य करत असल्यावरुन फडणवीसांचं वक्तव्य!

News Desk