HW News Marathi
महाराष्ट्र

वास्तविक हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव केलाय – अण्णा हजारे  

मुंबई | नाशिकमध्ये चक्क सरपंचपदाचा लिलाव झाल्याची माहिती समोर आली होती. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही ग्रामपंचायतींनी सरपंचाच्या पदाचा लिलाव करून बोली लावल्याची बातमी वाचली. वास्तविक पाहता हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव केला आहे, अशा शब्दात अण्णा हजारेंनी याला विरोध केला आहे. अण्णा हजारे यांनी यासंदर्भात एक पत्रक काढलं आहे.

ज्या लोकशाहीसाठी १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षात लाखो लोकांनी जेलमध्ये जाऊन, भूमिगत राहून इंग्रजांच्या गोळ्या, लाठ्या-काठ्या खाऊन अनंत हाल अपेष्टा सहन केल्या. जुलमी, अन्यायी इंग्रजांना देशातून घालवायचे आणि आमच्या देशात लोकांची, लोकांनी, लोक सहभागातून चालविलेली लोकशाही आणायची असं त्यांचं स्वप्न होतं. पण सरपंच पदाचा लिलाव म्हणजे त्या लोकशाहीचाच लिलाव आहे असं आमचं मत आहे, असं अण्णा हजारे म्हणाले आहेत.

ज्यांनी देशात लोकशाही यावी यासाठी काही लोकांनी प्राणांचे बलिदान केले त्यांचे बलिदान व्यर्थ झाले आहे काय? किंवा 70 वर्षात काही लोकांना लोकशाहीचा अर्थ समजला नाही की काय?, असा सवाल अण्णा हजारे यांनी केला आहे.ग्रामपंचायत सरपंच पदाचा लिलाव झाला तर लोकसभा आणि विधानसभा कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या आमदार आणि खासदार यांना ग्रामसभेने निवडून पाठवलं असल्याने आणि लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक त्या पवित्र मंदीरामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

राज्यातील विविध निवडणुका कायमच चर्चेचा विषय असतो. एकीकडे निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विविध आमदार निधी देण्याची घोषणा करीत आहेत. तर दुसरीकडे मात्र उमराणे (देवळा) येथे निवडणुकीला फाटा देत चक्क सरपंचपदाचा लिलाव झाला आहे. कांदा बाजारपेठ असलेल्या संपन्न गावात सरपंच पदाच्या लिलावाची बोली १ कोटी ११ लाखांपासून सुरु झाली. त्यात सुनील दत्तू देवरे यांनी दोन कोटी पाच लाखांची बोली देऊन सरपंचपद पटकावले आहे.

आज सकाळी बाजार समितीच्या आवारातच हा लिलाव झाल्याचे म्हटले जाते. याचा एक व्हीडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. हा लिलाव बाजार समिती जवळ रामेश्वर महाराज मंदिरात झाला. त्यात शेतकरी व शेतीशी संबंधीत व्यापार करणारेच आघाडीवर होते. सुरवातीची बोली १.११ कोटींची होती. आधी फारसे प्रतिसाद नव्हते. मात्र शेवटच्या टप्प्यात त्यात चढाओढ सुरु झाली. कदाचीत या चढाओढीनेच ही बोली थेट २ कोटी ५ लाखांवर पोहोचली. त्यात सुनिल दत्तू देवरे यांनी बाजी मारली. एरव्ही त्यांनी थेट सरपंचपदाची निवडणूक लढविण्याची तयारी केलीच होती. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून ते उमेदवारी करीत होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंनी पाळला महाविकास आघाडीचा धर्म!

News Desk

कोस्टल रोडचे काम करताना वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घेण्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे निर्देश

Aprna

विधानसभा पुढच्या वर्षी घ्या, राज ठाकरेंची मागणी !

Arati More