HW News Marathi
Covid-19

बच्चन कुटुंबानंतर आता अभिनेते अनुपम खेर यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव…

मुंबई | कोरोना विषाणूचा शिरकाव अनेक अभिनेत्यांनासुद्धा झालेला पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या घरातही शिरकाव केला आहे. बीग बी अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता त्यानतंर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या कुटुंबातील काही व्यक्तिंना देखील कोरोनाची लागण झालीय . अनुपम खेर यांनी ट्विटर वर एक व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. खेर यांची आई, भाऊ, वहिनी, पुतणी यांना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तेथे उपचार सुरु आहेत. अनुपम खेर यांचीही चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातही तोक्ते वादळ आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधानांचा भेदभाव का? पंतप्रधानांच्या गुजरात दौऱ्यावर राष्ट्रवादी भडकली !

News Desk

चिंताजनक ! देशात गेल्या २४ तासात २८,७०१ नवे कोरोना रुग्ण

News Desk

मजुरांना रोजगार निर्माण होणार, ‘गरीब कल्याण रोजगार योजने’चे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन

News Desk