HW News Marathi
महाराष्ट्र

“मोदी मंदिरात दर्शनाला जो येईल त्याला लगेच…”प्रशांत जगतापांची मोदींवर खोचक शब्दात टीका!

पुणे। पुण्यामधील औंध येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर हटवण्यात आलं आहे. रात्री या मंदिरामधून मूर्ती हटवण्यात आलीय. मात्र आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या नावाची आरती म्हणून मोदींचं मंदिर उभारण्याच्या या कृत्याचा निषेध केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांनी भाजपा तसेच पंतप्रधान मोदींवर खोचक शब्दात टीका केलीय. १५ लाखांच्या मुद्द्यावरुन जगताप यांनी या मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला १५ लाखांचा डीडी मिळणार असं वातावरण पुणे भाजपाने निर्माण केल्याचा टोला लगालवाय.

या देवाला पेट्रोल, गॅस, डिझेल हा नैवद्य आवडतो

भाजपाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी १५ लाख देणार असं म्हणाले होते. तर इथं दर्शनला जो येईल त्याला लगेच १५ लाखांचा डीडी मिळणार असं वातावरण तयार झालेलं. पण आम्ही पाहतोय तर नरेंद्र मोदी नावाचा देवच चोरीला गेलाय,” असा टोला जगताप यांनी लगावला. “या देवाला पेट्रोल, गॅस, डिझेल हा नैवद्य आवडतो, तो सुद्धा आम्ही घेऊन आलेलो. १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यापासून २०१४ पर्यंत या नैवद्याचे दर मर्यादित होते. मात्र या देवाला हे खाद्य इतकं आवडतं की त्याने याचे दर वाढवून ठेवलेत. हा नैवद्य दाखवण्याआधीच देव चोरीला गेला. देव रुसून गेलाय. या पुणे शहराचे प्रश्न सोडवण्याची ताकद या देवात नाहीय,” असंही जगताप यावेळी म्हणाले.

एक अंधभक्त माथेफिरु

प्रसारमाध्यमांशी बोलताना जगताप यांनी भाजपावर टीका केली. हे मंदिर उभारल्याने पुण्यातील सर्व प्रश्न सुटणार आहेत असा गाजावाजा पुणे भाजपाने केल्याचा आरोप जगताप यांनी केलाय. तसेच हे मंदिर उभारणाऱ्या मयुर मुंडेचा उल्लेख जगताप यांनी ‘एक अंधभक्त, माथेफिरु’ असा केला. “चार दिवसांपूर्वी येथील एका अंधभक्ताने, माथेफिरुने नरेंद्र मोदी नावाच्या देवाचं मंदिर निर्माण केलं होतं. चार दिवसांमध्ये पुण्यातील भाजपाने असं चित्र निर्माण केलेलं की नरेंद्र मोदी नावाचे देव पुण्यात अवतरलेत. ते आल्यानंतर पुण्यातील प्रश्न आता संपणार आहेत. पुण्यात रुपयाने पेट्रोल, ४० रुपयांनी डिझेल. २०० रुपयांनी सिलेंडर मिळणार आहे. महागाई संपणार, रस्ते चकाचक होणार, कचरामुक्त पुणे होणार असं चित्र निर्माण करण्यात आलं,” असा टोला जगताप यांनी लगावला.

शहराचे प्रश्न सोडवण्याची ताकद या देवात नाहीय

तसेच पुढे बोलताना मोदी नावाच्या या देवाला पेट्रोल, गॅस, डिझेल हा नैवद्य आवडतो, तो सुद्धा आम्ही घेऊन आलेलो. १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यापासून २०१४ पर्यंत या नैवद्याचे दर मर्यादित होते. मात्र या देवाला हे खाद्य इतकं आवडतं की त्याने याचे दर वाढवून ठेवलेत. हा नैवद्य दाखवण्याआधीच देव चोरीला गेला. देव रुसून गेलाय. या पुणे शहराचे प्रश्न सोडवण्याची ताकद या देवात नाहीय, असंही जगताप म्हणाले.

पेट्रोल डिझेलचे दरवाढ कमी व्हावी या मागणीसाठी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते मोदी मंदिरासमोर साकडे घालण्यासाठी आले होते. परंतु त्या आधीच मंदिरातून मोदींची मूर्ती हटवण्यात आली होती. ही मूर्ती भाजपच्या नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या कार्यालयात असल्याचे सांगितले जात आहे. “आता तरी मोदी देवा पावणार का?, भक्तांच्या मदतीला धावणार का? महागाई कमी करणार का करणार का?,” असं गाणं, आरती म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या मंदिरासमोर पूजा केली. कालच घरगुती वापराच्या सिलेंडरचे दर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भातुकलीमधील सिलेंडर प्रातिनिधिक स्वरुपात या मंदिरासमोर मांडण्यात आलेला. तसेच पेट्रोल, डिझेल आणि तेलाच्या बाटल्याही या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. पेट्रोल, डिझेल, तेल, मसाल्याचे पदार्थ यांचा नैवेद्य दाखवून आरती देखील यावेळी करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राम शिंदेंचा कट्टर समर्थक रोहित पवारांच्या गटात दाखल’

News Desk

केंद्राने मला दिलेलं मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कुठेही जात नाही – चंद्रकांत पाटील 

News Desk

“लबाड लांडगं ढोंग करतंय, मी पुन्हा येईनचं सोंग करतंय!”, चाकणकरांचा फडणवीसांना टोला

News Desk