HW News Marathi
महाराष्ट्र

शहरासह ग्रामीण भागात गौरीचं जल्लोषात आगमन

फुलचंद भगत,

मंगरूळपीर शहरतसचे ग्रामीण भागात गौरींचे आज मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. भाद्रपद महिन्याच्या अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होते. कोकणातील अनेक गावागावात आजही पारंपारिक पद्धतीने गौरीचे स्वागत केले जाते. दरवर्षी गौरींना नव्या वस्त्रालंकारानी सजवले जाते. अनेक घरांमध्ये गौरींनी पारंपरिक दागिन्यांनी सजावले जाते. वस्त्रालंकारानी-आभूषणांनी सजवलेल्या या गौरीला आज गोड नैवेद्यही दाखवला जातो. घराच्या ओटी-पडवीत गौरीची ही मूर्ती सजली की दरातील माप ओलांडत तिला गणपतीच्या मखरात नेऊन पुजले जाते. गौरीच्या आगमनानंतर घरात झिम्मा-फुगडी, बस-फुगडी असे महिलांचे खेळ रात्रीपर्यंत सुरू राहतात. घरी आलेल्या माहेरवाशिणी सोबत रात्र जागवली जाते. संपूर्ण जिल्ह्यात गणराया पाठोपाठ आज झालेल्या गौरीच्या आगमनाने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाराज पंकजा मुंडेंची मनधरणी करण्यासाठी विनोद तावडेंची भेट

News Desk

भीम आर्मीची उद्या अमरावतीमध्ये सभा

News Desk

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाही !

swarit