मुंबई | आर्यन खानच्या मोबाईमधील व्हॉट्सअॅप चॅट्स पाहिल्यास त्यात काहीही संशयास्पद असे काही सापडलं नाही, असे अत्यंत महत्वाचं निरीक्षण मुंबई हायकोर्टानं आर्यनच्या जामीन अर्जावर नोंदवलं आहे. आर्यन खान, अरबाझ मर्चंड आणि मुनमुन यांना स्वातंत्र प्रवास करत होतं. आर्यन खानविरोधात कोणताही पुरावे नसल्याचं कोर्टानं सांगितलं, असे आर्यन खानच्या जामीन अर्जावर २८ ऑक्टोबरला दिलेल्या हायकोर्टाच्या म्हटलं.
आर्यन खाननी ड्रग्ज घेतल्याची योजना आखल्याचं पुरावं सापडलं नाही. आर्यन, अरबाज मर्चंड आणि मुनमुन हे तिघेही एकाच क्रूझवर असल्यामुळे यांच्याविरोधात कट रचल्याचा आरोप होऊ शकत नाही. या प्रकरणात अरबाजकडे ५ ग्रॅम ड्रग्ज सापडले होते. एनसीबीच्या माहितीनुसार, आर्यन खान हा अरबाजचा मित्र असल्याने तोही ड्रग्जचं सेवन करत असेल असे होत नाही.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान हा मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. गेल्या २६ दिवसांनंतर आर्यनला २८ ऑक्टोबरला हायकोर्टाकडून जामीन मंजूर मिळाला आहे. आर्यनला ३० ऑक्टोबरला तुरुंगातून सुटका झाली असून हायकोर्टासह आर्यनला १४ अटींवर जामीन मंजूर झाला आहे.