HW News Marathi
महाराष्ट्र

अंत्यविधीसाठी स्माशानभूमीला जागा नसल्याने चक्क प्रेत केज तहसीलसमोर ठेवले

बीड | गावात अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने, संतप्त ग्रामस्थांनी चक्क मयत महिलेचे प्रेत, तहसील कार्यालयासमोर ठेवले आहे. ही खळबळजनक घटना बीडच्या केज शहरात घडलीय. केज तालुक्यातील सोनेसांगवी येथे अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नाही. यामुळे एखादा व्यक्ती मयत झाला तर गावकऱ्यांसमोर अंत्यविधीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ स्मशानभूमीची मागणी करत आहेत.

दरम्यान, प्रशासन याची कोणतीच दखल घेत नसल्याने, आज (५ जानेवारी) मयत झालेल्या लक्ष्मीबाई कसबे यांचे प्रेत, चक्क केज तहसील समोर मांडण्यात आले आहे. अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतलाय. मात्र, वारंवार ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यलयांना स्मशानभूमीसाठी जागा द्या, ही मागणी निवेदन पत्र देऊन केली. याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने आज गावकरी आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत प्रेत उचलणार नाही, असा पवित्रा देखील सोनेसांगवीच्या ग्रामस्थांनी घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं ते सांगा”, उदयनराजेंचा थेट अजित पवारांना सवाल

News Desk

आयकर विभागाचा छाप्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी बंद – चंद्रकांत पाटील

News Desk

मुंडे साहेब यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल असा विश्वास मी तुम्हाला देतो !

News Desk