HW News Marathi
महाराष्ट्र

“नांदेडमध्ये झालेला प्रकार हा धक्कादायक आणि दुर्दैवी, दोषींवर कारवाई होणार” – अशोक चव्हाण  

नांदेड | नांदेडमध्ये काल (२९ मार्च) होळीच्या दिवशी एक भयंकर घटना घडली. नांदेडमध्ये शीख बांधवांच्या होला मोहल्ला या कार्यक्रमात झालेली तोडफोड आणि पोलिसांवरील हल्ल्याचं प्रकरण आता वाढू लागलं आहे. या प्रकारामध्ये अनेक पोलिसांवर जमावातील काही समाजकंटकांकडून हल्ले करण्यात आले असून अनेक पोलीस रुग्णालयात देखील दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर आता नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “नांदेडमध्ये झालेला प्रकार हा धक्कादायक आणि दुर्दैवी होता. पोलीस प्रशासन त्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई नक्की करेल”, असं अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने होळी खेळण्यासाठी काही निर्बंध लावले होते. मात्र, सणासुदीला गालबोट लावणारी एक घटना घडली आहे.नांदेड येथे होळीच्या दिवशी शिख समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी होल्ला मोहल्लाची मिरवणूक काढण्यात येते. परंतु जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाकडून लॉकडाऊन लावण्यात आला असल्याने, या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करत हल्लाबोल मिरवणुकीतील काही तरुणांनी परवानगी का नाकारली म्हणून चक्क पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. यात चार पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून पोलिस अधीक्षक यांच्या वाहनांसह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या गाड्यांचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहेत.

अशोक चव्हाण सोमवार रात्रीपासून नांदेडमध्येच!

दरम्यान, नांदेडचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे या प्रकारानंतर काल रात्रीपासून नांदेडमध्येच तळ ठोकून होते. यासंदर्भात सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आज दुपारी त्यांनी पत्रकार परिषदेत घडल्या प्रकाराची माहिती दिली. “मिरवणूक काढली जाणार नाही हे ठरलं होतं. मात्र, तरीदेखील काही मंडळींनी बॅरिकेड्स तोडली. बाहेर पडलेल्या काही लोकांनी पोलिसांवर निर्घृण पद्धतीने हल्ले केले. त्यातले काही पोलीस रुग्णालयात दाखल झाले आहेत. कालची घटना अतिशय निंदनीय आणि चुकीची आहे”, असं ते म्हणाले.

“या सर्व प्रकाराची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. ज्या पद्धतीने पोलिसांवर तलवारीने हल्ले झाले, ते भयानक आहे. पालकमंत्री या नात्याने मी काल रात्री नांदेडमध्ये आलो. सकाळी एसपी, आयजी, जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. चौकशीअंती जे स्पष्ट होईल, त्यानुसार कारवाई केली जाईल. ही घटना घडणं दुर्दैवी आहे”, असं देखील अशोक चव्हाण यांनी नमूद केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे शिक्षक मतदारसंघात अखेर काँग्रेसचे जयंत आसगावकर विजयी

News Desk

ईडीने आज मुंबईत येस बँकेच्या कर्जदारांवर छापे टाकले

News Desk

महापालिका निवडणुकीत भाजप सोडून इतर पक्षांनी एकजूट व्हावं – शरद पवार

News Desk