HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या ‘त्या’ व्हिडिओवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये ट्विटर युद्ध

मुंबई। “नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतचे बाप काढले, शरद पवार हे नेहमीच हिंदूचा द्वेष करतात, ” अशा आशयाचे ट्वीट करत महाराष्ट्र भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ट्विट करत टीका केली आहे. पवारांच्या साता-याती भाषणाचा व्हिडिओ भाजपने त्यांच्या ट्वीटर हँडलवरून पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली आहे.

सध्या शरद पवार यांचा साता-याती भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पवारांचा हा व्हिडिओ भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केला आहे. हा व्हिडिओ अर्धवट असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस ट्विट करत सांगितले आहे. यामुळे आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये ट्वीटर वॉर चालू झाली आहे.

भाजपने केलेल्या ट्विटमध्ये नेमके काय म्हणाले

नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदू धर्ममाची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केला नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा!


राष्ट्रवादीने देखील ट्विट करून दिले प्रत्युत्तर

दरम्यान, राष्ट्रवादीने शरद पवारांच्या ट्वीटला ट्वि करून सडेतोड उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीने शरद पवारांचा पूर्ण व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केला असून भाषणादरम्यान शरद पवारांनी कवी जवाहर राठोड यांच्या कवितेचा आशय दिला. राठोड यांनी लिहिलेल्या कवितेचा फोटो देखील ट्विट केला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांचा नातू अपरिपक्व नाही हे वारंवार सिद्ध होतंय!

News Desk

मी एकट्या भाजपचा नव्हे, तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री !

News Desk

मनसेच्या आपत्ती व्यवस्थापनाची राज ठाकरेंकडून घोषणा, कसं असेल पथक?

News Desk