HW News Marathi
महाराष्ट्र

उपअधीक्षकाकडून छेडछाड झाल्याचा आरोप करत महिलेचा मंत्रालय परिसरात आत्महत्येचा प्रयत्न!

मुंबई। राज्यात अनेक ठिकाणी हादरवून टाकणाऱ्या घटना घडत असतानाच आता दुसरीकडे मात्र मुंबईतील मंत्रालयाच्या बाहेर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडच्या पोलीस उपअधीक्षकांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या प्रकरणी न्याय मिळत नसल्याने मुंबईत येऊन मंत्रालय परिसरात तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. तक्रार करणारी महिला ही वकील आहे. आत्महत्येच्या प्रयत्नाचा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

न्याय मिळत नसल्याचा आरोप

दौंड येथील महिलेने मुंबईतील मंत्रालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण दोंडचे डीव्हायएसपी यांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार करुनही कारवाई केली जात नव्हती. पोलिसांकडून महिलेवरच गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाद मागण्यासाठी वकील महिला वारंवार वरिष्ठ पोलिसांची भेट घेत होती, तरीही न्याय मिळत नसल्याचा आरोप करत तिने हे मोठं पाऊल उचलत मंत्रालय परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या वकील महिलेने तिसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. सबंधित महिला मरिन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहांनी कितीही ताकद पुरवली तरी शिवसेना नारायण राणेंना धुळ चारल्याशिवाय शांत राहणार नाही…! 

News Desk

कसब्यातील विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी घेतली शरद पवारांची भेट

Aprna

भाजपकडून विधान परिषदेसाठी डच्चू ; तर पंकजा मुंडे म्हणतात…

News Desk