HW News Marathi
महाराष्ट्र

नगरसेवकांनी नागरिकांना कंपाऊंडरकडूनच औषधे घेण्याकरिता प्रोत्साहित करु नये

मुंबई |माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमअंतर्गत शिवसेना नगरसेवकांनी लावलेल्या पोस्टर्सवरुन वाद निर्माण झाला आहे. या पोस्टर्समध्ये कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास कोणती औषधे घ्यावीत याची जाहिरात करण्यात आली आहे. यावरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. शिवसेना नगरसेवकांनी नागरिकांना डॉक्टरांचा सल्ला न घेता कंपाऊंडरकडूनच औषधे घेण्याकरिता प्रोत्साहित करु नये असं त्यांनी म्हटलं आहे.

याबाबत अतुल भातखळकर म्हणाले की, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माधुरी नाईक, संजना घाडी, सुजाता पाटेकर या नगरसेवकांनी डॉक्टरांचा कोणताही सल्ला न घेता लक्षणानुसार कोरोनावरील औषधे कधी व कशी घ्यावीत याची जाहिरातबाजी करुन सोशल मीडियात प्रसार केल्याचं उघड झालं. शिवसेना नेत्यांकडून प्रेरणा घेऊन नगरेसवकांनी कंपाऊंडरकडून औषधे घेण्याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करु नका असा टोला त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता शिवसेनेला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोठी बातमी ! पुण्यात रात्रीची संचारबंदी,रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंतची संचारबंदी…

News Desk

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात झाली चोरी 

News Desk

विधानसभेत फडणवीसांचा व्हिडिओ बॉम्ब, राज्य सरकारवर गंभीर आरोप

Aprna