HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात ओमायक्रॉनचा नवा व्हेरियंट सापडल्याने एकाच खळबळ; जाणून घ्या आरोग्य मंत्री काय म्हणाले

मुंबई। कोरोनाच्या ओमायक्रॉनचा नवा व्हेरियंट असलेले बीए. ४ आणि बीए. ५ चे रुग्ण राज्याच आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. या व्हेरियंट ७ रुग्ण पुणे शहरात सापडले आहेत. या रुग्णांचे नमुने पुण्यातील बी. जे वैद्यकीय महाविद्यालयाच झालेल्या चाचणीतून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, हे सर्व रुग्ण पुणे शहरातील ४ मे ते १८ मे २०२२ या कालावधीत मधील आहेत. या रुग्णांमध्ये चार पुरुष, तर तीन महिला आहेत. नवा व्हेरियंट ज्या रुग्णामध्ये अढळला त्यात ५० वर्षावरील चार, २० ते ४० वर्षावरील दोन आणि एक नऊ वर्षांचा आहे. दोन जणांनी दक्षिण आफ्रिका आणि बेल्जियम असा प्रवास केला आहे. तर केरळ आणि कर्नाटक येथे प्रवास केला आहे. दोन जणांनी प्रवास केला नाही. या रुग्णांपैकी नऊ वर्षे वयाच्या मुलगा सोडला तर सर्वांचे लसीकरण झाले आहे. यातील एका रुग्णांतर बुस्टर डोस देखील घेतला आहे.

यावर बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “मुंबईत का ५०० रुग्णाची वाढ झालेली आहे. क्लस्टर भाग असणाऱ्या ठाणे, पुणे आणि पालघर याठिकाणी रुग्णांच्यासंख्येत वाढ करण्यात आली आहे. यावर राज्य सरकारला उपयोग कराव्या लागतील.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी देऊ! – देवेंद्र फडणवीस

Aprna

आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत !

swarit

‘मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाजपच्या मनात खोट’, खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप!

News Desk