HW News Marathi
देश / विदेश

रामाचे दर्शन घ्यायला आपण जगलं पाहिजे, माणसं जगवा!

मुंबई | ऑगस्टमध्ये राम मंदीराचे भूमिपूजनाचे करण्यात येणार आहे. या वरुन काल (१९ जुलै) राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता. राम मंदिराचे भूमिपूजन करुन जर कोरोना जाणार असेल तर करा, असे त्यांनी म्हटले होते. यावरुन राजरीय वर्तृळातुन शरद पवारांवर पलटवार झाले. मात्र, यांवर विरोधक पक्षाची उलटून उत्तर देखील देण्यास आले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. कोरोनाच्या काळात राममंदिराचे भूमिपूजन इतके महत्त्वाचे आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी आज (२० जुलै) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि विरोधक पक्षाला पलटवार केला आहे.

श्रीराम दैवत आहे. पण रामाचे दर्शन घ्यायला आपण जगले पाहिजे. आपण जगलो तर रामाचे दर्शन घ्यायला जाऊ. त्यामुळे केंद्र सरकारने आता लोकांना जगवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मात्र, केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात सरकारच्या अपयशावरून दुर्लक्ष करण्याकरता हा राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे स्पष्ट मत थोरातांचा मांडले.तसेच, राजकीय वर्तृळात या पूजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार का या वरुन चर्चा सुरु झाल्या. याबद्दलच थोरातांचा विचारले असता तो त्यांच्या श्रद्धेचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. त्यामूळे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा वाद पेटला आहे. आणि सत्ताधारी पक्ष आणि विरोधक पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोप करण्यासाठी सुरूवात झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींनी आता रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून बाहेर पडून रुझवेल्टच्या भूमिकेत शिरावे!

News Desk

अमेरिकेतील व्हर्जिनियामधील गोळीबारात १२ जणांचा मृत्यू, ६ जण जखमी

News Desk

शबरीमाला निर्णयाच्या निषेधार्थ केरळ बंद

swarit