Site icon HW News Marathi

बारसू ग्रामस्थांचा रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध; आंदोलकांनी निलेश राणेंचा रोखला ताफा

मुंबई | रत्नागिरीतील बारसू रिफायनरीसाठी (Refinery) आज पुन्हा सर्वेक्षण होणार होते. पण, विरोधकांनी ग्रामस्थांनी आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बारसू रिफायनरी विरोधक करणाऱ्या ग्रामस्थांनी राणेंचा ताफा अडविला आहे.

रिफायनरीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी ग्रामस्थांनी महिलांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. नाणारमध्ये होणारी ऑईल रिफायनरी तेथे घातक ठरते, आणि आमच्या गावात ती रिफायनरी चांगली कशी ठरते, असा सवाल आंदोलक करणाऱ्या महिलांनी निलेश राणेंना केला.

निलेश राणे म्हणाले, “तुम्ही जागा ठरवा, आपण सर्व जण बसून बोलू,” असे सांगत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पुढे राणे म्हणाले, “आम्हाला थांबवून सांगायचे होते की, आम्ही एकत्र बसून चर्चा करणार आहोत. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. तुम्ही सांगा, त्या ठिकाणी येवून चर्चेतून आपण मार्ग काढू.”

नाणारहून बारसू येथे रिफायनरी हलवण्यात आली. बारसू येथील मृदा तपासणीसाठी आलेल्या सरकारी पथकाला काल ग्रामस्थांनी अडविले होते. यानंतर राणे आज बारसू येथे गेले होते. तेव्हा राणेंना देखील ग्रामस्थांनी अडविले. त्यावेळी आपण बसून बोलू, असे म्हणत त्यांनी ग्रामस्थांची माफी मागितली.

 

Exit mobile version