HW News Marathi
देश / विदेश

कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्माईंची निवड!

कर्नाटक। बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री ठरले आहेत. बीएस येडियुरप्पा मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाल्यानंतर त्यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी वर्णी लागली आहे. ते कर्नाटकचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. बोम्मई हे गृहमंत्री होते. पुढचे मुख्यमंत्री तुम्ही असणार का? या प्रश्नावर त्यांनी नकारात्मक उत्तर दिलं होतं. मात्र, आता त्यांचीच मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली आहे.

कोण आहेत बसवराज बोम्मई?

बसवराज बोम्मई यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी निवड झाली आहे. नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे बीएस येदियुरप्पा यांच्या जवळचे मानले जातात. येदियुरप्पा यांच्या नंतर बसवराज बोम्मई हे लिंगायत समुदायातील मोठे नेते मानले जातात. त्यांच्या निवडीनंतर लिंगायत समुदायाचा असंतोष कमी होईल.. दुसरी बाब म्हणजे ते संघ परिवाराशी संबंधी आहे. बोम्मई हे येडीयुराप्पा सरकारमध्ये गृहमंत्री होते. खाण मंत्री मुरगेश निरानी, गृह मंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि चौथे बसवंगौड़ा पाटील यतनाल यांची नावे चर्चेत होती. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे यांचेही नाव चर्चेत आले होते. दिल्लीत येडीयुराप्पा यांनी माझ्या मर्जीतला नेताच मुख्यमंत्री करावा अशी अट घातली होती. यानुसार भाजपाने सुवर्णमध्य साधत बोम्मई यांना मुख्यमंत्री पद दिले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी काल(२७ जुलै) याची घोषणा केली होती.

आधीच संकेत दिले होते

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी २६ जुलै आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. जेवल्यानंतर राज्यपालांना भेटू, असं त्यांनी कर्नाटक सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सोहळ्यात सांगितलं. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच येडियुरप्पा यांनी पायउतार होण्याचे संकेत दिले होते. गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट घेतली होती.

बीएस येडियुरप्पा यांनी राजीनाम्याचे संकेत आधीच दिले होते. बंगळुरुत झालेल्या धन्वंतरी होमहवनाला हजेरी लावल्यानंतर गेल्या गुरुवारी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केलं होतं. “२५ जुलैला हायकमांडकडून मला नोटीस मिळणार आहे. त्यानुसार मी पुढचा निर्णय घेईन. पक्ष मजबूत करणे आणि पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे, या दृष्टीने माझी पुढची वाटचाल असेल. मी दिवसरात्र त्यासाठीच मेहनत करत असतो, कृपया सहकार्य करा” असं वक्तव्य बीएस येडियुरप्पा यांनी केलं होतं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परीक्षा पे चर्चा २.० : आपली स्वप्ने आपल्या मुलांवर थोपविणे अयोग्य | मोदी

News Desk

नागरिकत्व सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडणार

News Desk

शोपियानमधील चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk