HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी सेल्फ क्वारंटाईन

बीड | बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाने परळी, बीड, अंबाजोगाईत कॉन्टॅक्टेस्टींगचे काम हाती घेतले असतानाच कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सतर्कता बाळगत स्वत:हून होम क्वारंटाईन झाले असल्याचे सांगण्यात येते. त्यापूर्वी सकाळी जिल्हाधिकार्‍यांनी सकाळी धनंजय मुंडेंसह त्यांच्या पीएच्या संपर्कात आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन होण्याबाबत आवाहन केले होते.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी राहूल रेखावार हे धनंजय मुंडे यांच्यासोबत होते. त्याचबरोबर अन्य अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. आज धनंजय मुंडे पॉझिटिव्ह आल्यानंतर आजपर्यंत कोरोना महामारीत जिल्ह्याचे सूत्र व्यवस्थीत हाताळणारे जिल्हाधिकारी राहूल रेखावार खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:हून होम क्वारंटाईन झाल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोण असेल नवीन भाजप प्रदेशाध्यक्षपदी’, आशिष शेलार की संजय कुटे!

News Desk

काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत किती जागांवर लढणार?

News Desk

गॅसप्रमाणे रेल्वेशुल्कातले अनुदानही परत करण्याची मागणी

News Desk