HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या, केज नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसचा धक्का!

बीड | बीड जिल्ह्याच्या केज नगरपंचयात निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस व भाजप पुरस्कृत जनविकास आघाडीने एकत्र येत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी चक्क काँग्रेसने स्थानिक जनविकास आघाडीला पाठींबा दिला आहे.

या संदर्भात खासदार रजनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि जनविकास आघाडी केजच्या विकासासाठी एकत्र आली असून नगरपंचयातमध्ये सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे आदित्य पाटील व जनविकास आघाडीचे हारून इनामदार यांनी शिवनेरी बंगला येथे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषित केले. केज नगरपंचयात निवडणुकीत जनविकास आघाडी ८, राष्ट्रवादी ५, काँग्रेस ३ तर एक अपक्ष असे उमेदवार निवडून आले होते. परंतु यामध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला होता.

याच नगर पंचाययीच्या निवडणुकीत भाजपने चिन्ह न दिल्याच्या कारणावरून निवणूक प्रचारामध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला होता तर, वारंवार पंकजा मुंडे यांना डीवचण्याचे प्रयत्नही केले होते तर केज मध्ये कमळाचे एक चिन्ह दाखवा मी तुम्हाला बक्षीस देतो असे आव्हान ही मंत्री धनंजय मुंडे यांनी डंके की चोट पर केले होते. 

मात्र एवढा आटा पिटा करून देखील शेवटी धनंजय मुंडे यांच्या वाट्याला निराश्या अली असून पंकजा मुंडे यांनी जादूची कांडी फिरवत केज नगर पंचायतीचे गणित बदलले. राष्ट्रवादी काँग्रेस ला काँग्रेस आय ने मोठा झटका देत केज च्या विकासासाठी काँग्रेस च्या खासदार रजनी पाटील यांच्या नेत्तुत्वाखाली भाजप पुरस्कृत जनविकास आघाडी व काँग्रेस एकत्र आले असून सत्ता स्थापन करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगून चित्र स्पष्ट केले असल्याने चर्चांना उधाण उठले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST कर्मचाऱ्यांसोबत अरेरावीची भाषा करणे योग्य नाही; राज ठाकरेंची सरकारवर टीका

News Desk

मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची ‘अशी’ आहे कारकीर्द !

News Desk

भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का ? – जयंत पाटील

Aprna