HW News Marathi
Covid-19

मोदींच्या भेटीआधी अजित पवार, शरद पवार ठाकरेंच्या भेटीला वर्षावर !

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या म्हणजे ८ जूनला दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.मराठा आरक्षण,स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण,जीएसटी परतावा,लसीकरण अशा अनेक मुद्यांवर ही भेट आहे.या भेटीआधीचं उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. शरद पवारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.मराठा आरक्षणाबाबत ठाकरे आणि मोदींची भेट होतेय या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट महत्त्वाची आहे. याशिवाय या भेटीमध्ये महाराष्ट्रातील महामंडळावरील नियुक्त्यांबाबतही चर्चा होऊ शकते.

मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरेंकडे असलं तरी महाविकासआघाडीचा रिमोट शरद पवारांच्या हातात आहे. यामुळे उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीपूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाची चर्चा होणार साहजिक आहे.महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत केंद्र सरकरशी नेमकी काय चर्चा करायची याबाबत पवार-ठाकरे भेटीमध्ये चर्चा होऊ शकते.

उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन मोदींना भेटणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री झाल्यापासून मोदी -ठाकरे यांची ही दुसरी भेट असणार आहे. या भेटीत मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्यातील १६ भागांमध्ये आजपासून ३१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन

News Desk

सीरम-भारत बायोटेक मधला ‘लसी’चा वाद मिटला

News Desk

कोरोना लसीच्या वाटपात गैरव्यवस्थापन, महाराष्ट्रासोबत दुजाभाव का?

News Desk