HW News Marathi
महाराष्ट्र

‘मी घटनेनुसार काम करतोय’, राज्यपालांचं कोशारीचं प्रत्युत्तर!

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मराठवाडा दौऱ्यावर राज्यसरकारने अनेक टीका केल्या. त्यांनी दौरा रद्द करावा हा सल्ला देखील दिला. आता यावर राज्यपालांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी संविधानाने दिलेल्या घटनेनुसारच काम करतोय आणि कुणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

मी कोणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही

नांदेड दौऱ्यावर असताना राज्यपाल यांनी नवाब मालिकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यपाल सध्या नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान बैठक नाही तर स्थानिक अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली, असं राज्यपाल म्हणालेत. मी कोणाच्या अधिकारक्षेत्रात जाण्याचा प्रश्नच नाही, मी माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तीन मंडळांचं काम करतोय, असं राज्यपालांनी स्पष्ट केलं. जेवढी मदत करता येईल तेवढी मदत राज्य आणि केंद्र सरकारकडून एकत्रित केली जाणार असंही राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी म्हटलं आहे.

राज्यपालांचं एक पाऊल मागे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्यावरून राज्य सरकारने नाराजी व्यक्त केली होती आणि कामात ढवळाढवळ करू नये याचा सल्ला देखील दिला होता. मराठवाडा दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकांवरून वादंग निर्माण झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. ५ ऑगस्टपासून ते नांदेड, परभणी आणि हिंगोलीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा सुधारित कार्यक्रम राजभवनाने बुधवारी जारी केला असून तिन्ही आढावा बैठका रद्द करत केवळ शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. यामुळे आघाडी सरकार आणि राजभवन यांच्यातील संघर्षावर तात्पुरता पडदा पडला आहे.

काय म्हणाले नवाब मलिक?

राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने नांदेड येथील स्वा. रा. तीर्थ विद्यापीठात दोन वसतिगृहे बांधली आहेत. सध्या वसतिगृहे विद्यापीठाकडे सोपवलेली नाहीत. त्यामुळे त्याचे उद्घाटन राज्यपालांनी करू नये, असे आवाहन अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केले होते. मात्र राज्यपालांनी हे आवाहन धुडकावले. सुधारित दौऱ्यातही वसतिगृहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम कायम ठेवण्यात आला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धार्मिक व जातीय सलोखा कायम ठेवावा! – उपमुख्यमंत्री

Aprna

जाणून घ्या… शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

Aprna

“चोरीचा माल विकत घेणं हा सुद्धा गुन्हा,” अजित पवारांनी पत्र चोरल्याच्या आरोपाला संजय राऊतांचं भाजपला प्रत्युत्तर 

News Desk