HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी विचारलं, ‘वाढदिवसाची भेट काय देणार?’, भास्कर जाधव म्हणाले ‘चिपळूण सुंदर करुन देतो’!

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज (२७ जुलै) वाढदिवस आहे. सर्वच क्षेत्रातील लोकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, सध्या चर्चेत असलेल्या शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनीही उद्धव यांना फोन केला. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा स्वीकारल्यावर ‘वाढदिवसाची भेट काय देणार?’, असं भास्कर जाधव यांना विचारलं. त्यावर भास्कर जाधवांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भास्कर जाधवांचा फोन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त भास्कररावांनी आज त्यांना सकाळीच फोन केला. ‘तुमची प्रकृती चांगली रहावी, शतायुषी व्हावं, तुमच्या हातून असंच महाराष्ट्र हिताचं काम होवो’, अशा शुभेच्छा भास्कर जाधवां+नी मुख्यमंत्र्यांना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी भास्कररावांच्या शुभेच्छा स्वीकारत त्यांचे आभार मानले. भास्कर जाधवांच्या शुभेच्छा स्वीकारल्यावर मुख्यमंत्र्यांनी जाधवांना कोकणातल्या भीषण परिस्थितीची आणि विदारक वास्तवाची जाणीव करुन देत या सगळ्या प्रसंगानंतर ‘वाढदिवसाची भेट काय देणार?’ म्हणून त्यांना प्रश्न विचारला.

यावर जाधव म्हणाले की, “साहेब आपण चिपळूणला आला होतात, त्यावेळी मी आपल्यावतीने जनतेला शब्द दिला होता की मी माझ्या साथीदारांसह उध्वस्त झालेलं चिपळूण स्वच्छ सुंदर करेन… त्यानुसार माझ्या गुहागर मतदारसंघातील चारशे ते पाचशे लोकांसहित मी काल चिपळूण शहर स्वच्छ करण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. आजही लोकं स्वच्छता करत आहेत. आपल्या वाढदिवसानिमित्त ही आपल्याला भेट”, असं उत्तर भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपले कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो , असं प्रत्येकाला वाटतं . हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी , प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे . ते देशाला नेतृत्व देतील , अशा शुभेच्छा मी त्यांना देतो , असं राऊत म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मिलिंद एकबोटेंना पोलिस कोठडी

News Desk

राज्य सरकार आणि समता परिषदेच्या विधिज्ञांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद

Aprna

शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महाराष्ट्र यंग लिडर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’! – प्रा.वर्षा गायकवाड

Aprna