HW News Marathi
महाराष्ट्र

साखर कारखान्यांत मोठा घोटाळा, सोमैय्यांची रोहित पवारांच्या चौकशीची मागणी..!

मुंबई। साखर कारखान्यांच्या व्यवहारामध्ये पवार कुटुंबाने मोठा घोटाळा केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांचे नातू कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांनीही साखर कारखाना खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा केला आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करण्याच्या व्यवहारात रोहित पवार यांनी घोटाळा केला आहे. या कारखान्याला विकताना कमी किंमत केल्याचा आरोप रोहित पवार यांच्यावर किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच राज्य सहकारी बँकेतही पवार कुटुंबाने घोटाळा केला असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर जरंडेश्वर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे पुरावे ई़डीला सापडले असल्यामुळे हा कारखाना सील करण्यात आलाय, याबाबत अजित पवार यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी शालिनी पाटील यांनी केल्यानंतर आता यावरुनच भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी पवार कुटुंबावर निशाणा साधत आता रान उठवायला सुरवात केलीये. पवार कुटुंबाने साखर कारखान्यांमध्ये मोठा घोटाळा केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधातही कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्यांनी केली आहे.

या पवार कुटुंबाने शिखर बँकेत घोटाळा केल्यानंतर अनेक कारखाने लाटल्याचा आरोप देखील रोहित पवार यांच्यावर करण्यात आलाय, राज्य सरकारी बँकेच्या लिलावामध्ये मॅन्युप्युलेशन करुन ५० कोटी रुपयांना हा कारखाना विकत घेतला. यानंतर बारामती अॅग्रो साखर कारखाना रोहित पवार यांनी विकत घेतला आहे. याबाबतही ईडीने तपास करायला पाहिजे. महाराष्ट्र राज्य बँकेतील मोठा घोटाळा करण्यात आला आहे हा घोटाळा पवार कुटुंबाने केला असल्याचे आरोप किरीट सोमैय्या यांनी केला असून चौकशीची मागणी आता होवू लागलीये.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगनाला मिळालेलं राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या – संजय राऊत

News Desk

“स्मारक की मातोश्री ३?”  बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरुन मनसेचा शिवसेनेला सवाल

News Desk

शुभमंगल होण्यापूर्वी नवरदेवाचा मृत्यू

News Desk