HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार सुप्रिया सुळेंवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव!

मुंबई | महाराष्ट्राच्या धडाडीच्या महिला नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हुशार चेहरा, राजधानी दिल्लीत आपल्या कर्तृत्वाने संसदभवन गाजवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांचा आज (३० जून) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील नेते त्यांना शुभेच्छा देत आहे. त्यांच्या उदंड आयुष्यासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या खास त्यांच्या स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. तर धनंजय मुंडे आणि इतर अनेकांनी सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसाला खास ट्विट करत त्यांचं अभिष्टचिंतन केलं आहे.

ताकदीचा राजकीय वारसा असूनही सदैव विनम्र

संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरचा आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ताकदीचा राजकीय वारसा असुनही सदैव विनम्र असलेल्या मुलगी, आई, बहीण,पत्नी अशा यशस्वी भूमिका वठवून संसदपटू म्हणून तळपणाऱ्या सुप्रिया सुळे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आगे बढो! जय महाराष्ट्र!, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

मोठ्या बहिणीला उदंड आयुष्य लाभो

आमच्या जेष्ठ भगिनी, राष्ट्रवादीच्या नेत्या, बारामतीच्या लोकप्रिय खासदार, संसदरत्न आदरणीय सुप्रिया ताई, आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. जनसेवेसाठी आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आमच्या प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याही शुभेच्छा

राष्ट्रवादीच्या खासदार आणि अजित पवारांची बहिण सुप्रिया सुळे यांना त्यांचे बंधू तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

एकनाथ खडसेंनीही दिल्या शुभेच्छा

भाजपची साथ सोडत हाती राष्ट्रवादीचा झेंडा घेणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात कागदी व प्लास्टिक ध्वजांचा वापर टाळावा! – मुंबई उपनगर जिल्हाधिकारी

Aprna

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ‘आयएफसी’ सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

आज स्त्री शिक्षणाचे दालन खुल्या करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंची जयंती

News Desk