HW News Marathi
महाराष्ट्र

“अनिल देशमुख गायब का आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसने खुलासा करावा”भाजपकडून मागणी

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे ईडीच्या समोर उपस्थित नसल्याने त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. दुसरीकडे, सीबीआयने अनिल देशमुख यांच्या वकिलास थेट अटक केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. अशातच आता भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि अनिल देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अनिल देशमुख गायब का आहेत, असा सवाल करत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने खुलासा करावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.

केशव उपाध्येंचा सवाल

महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत, प्रगत राज्याचा माजी गृहमंत्री अनेक महिन्यांपासून गायब आहे. महाराष्ट्राला ही गोष्ट भूषणावह नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गायब होण्याबाबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अनिल देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडले आहेत.

अनिल देशमुख हे का गायब आहेत?

अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देताना सांगितले होते की, सीबीआय, ईडीकडून होणाऱ्या चौकशीला सर्व प्रकारचे सहाय्य करू. मात्र राजीनामा दिल्यानंतर देशमुख यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. आपल्याला अटक होऊ नये, यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर देशमुख यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही देशमुख यांचा युक्तीवाद अमान्य केला आहे. आता देशमुख हे गायब झाले आहेत. अनिल देशमुख हे का गायब आहेत? ते जनतेसमोर तपास यंत्रणांसमोर का येत नाहीत? याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने करावा, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महापौर पेंग्वीन पाहाण्यासाठी गुजरातला गेल्या, पण…; चित्र वाघांचा टोला

Aprna

कवयित्री ज्योती कदम यांना ” आम्ही जिजाऊंच्या वारसदार ” राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

News Desk

“मुख्यमंत्री सांत्वनासाठी दिलीप कुमारांच्या घरी गेले पण स्वप्निल लोणकरच्या आईला भेटण्यासाठी वेळ नाही”

News Desk