HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री होते, पण कधीच…! फडणवीसांनी डिवचलं

मुंबई । मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांनी केलेलं विधान राज्यभर चांगलंच गाजत आहे. या विधानानंतर सत्ताधारी महाविकासाघाडीकडून फडणवीसाची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही फडणवीसांना डिवचलं. “मी चार वेळा राज्याचा मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या हे कधीच लक्षात राहिलं नाही. ही आमची कमतरता आहे”,  असं शरद पवार म्हणाले. मात्र, आता त्यावर देवेंद्र फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. “शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री होते पण सलग ५ वर्षे कधीच नव्हते”, अशी बोचरी टीका फडणवीस यांनी केली.

“शरद पवार आणि माझ्या मुख्यमंत्रीपदामधला फरक हा आहे की मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री होतो. सलग ५ वर्षे पदावर असणारा चाळीस वर्षांनंतरचा मी पहिला मुख्यमंत्री होतो. पवार साहेब मोठे नेते आहेत. पण ते कधीच सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पदावर राहिले नाहीत. राहिले असते तर बरंच झालं असतं. त्यांनी चांगलंच काम केलं असतं. पण त्यांचा कार्यकाळ कधी अडीच वर्षे, कधी दीड वर्षे असा राहिला. मला एका गोष्टीचं मात्र समाधान आहे की, मी विरोधी पक्षनेता म्हणून समाधानी आहे हे पाहून महाविकास आघाडीचं सरकार अस्वस्थ झालं आहे. ही माझ्या कामाची पोचपावती आहे”, असं फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले

काय म्हणाले होते शरद पवार?

मुंबईतील पत्रकार परिषदेदरम्यान शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला “पाच वर्ष सत्तेत असल्याचं स्मरण राहणं हे नेहमीच चांगलं. त्यांच्या वेदना किती खोल आहेत हे दिसलं.  मी सलग चार वर्ष मुख्यमंत्री होतो पण माझ्या कधीच हे लक्षात राहिलं नाही. ही आमची कमतरता आहे. शेवटी सत्ता येते आणि जाते. त्याबाबत, फारसा विचार करायचा नसतो”, असं शरद पवार म्हणाले

Related posts

करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी!

News Desk

लोकसभेच्या निकालानंतर प्रथमच राज ठाकरेंनी घेतली पवारांची भेट

News Desk

ऑपरेशन कमळाबाबत काही सांगता येत नाही पण… – प्रसाद लाड

News Desk