पालघर | राज्यात एका मागोमाग एक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. काही जणांचा मृत्यू होत आहे तर काही जण बचावत आहेत. कोरोनामुळे आणखी एका नेत्याचा मृत्यु झाला आहे. भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गुजरातच्या वापी येथील रेनबो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज (१२ एप्रिल) पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पास्कल धनारे हे २०१४ साली डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. डहाणुतून निवडून येणारे ते भाजपचे प्रथम आमदार होते.
काही दिवसांपूर्वी पास्कल धनारे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर धनारे यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली. त्यामुळे पास्कल धनारे यांना वापी येथील रेनबो रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
कोण आहेत पास्कल धनारे?
कम्युनिस्ट आणि काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या डहाणू विधानसभा मतदारसंघात पास्कल धनारे यांनी पहिल्यांदा भाजपला विजयी केले होते. मात्र, नंतरच्या काळात पास्कल धनारे यांचा मतदारसंघातील जनसंपर्क कमी झाला होता. त्यामुळे पास्कल धनारे यांनी पक्षाची नाराजीही ओढावून घेतली होती. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारीही दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना अपयश आले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.