HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

जळगाव जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, रंजना पाटील विजयी

जळगाव | भाजपच्या हातातून जळगावच्या जिल्हा परिषदेतेच्या अध्यक्षपदी भाजपच्या रंजना पाटील विजयी झाल्या आहेत. भाजपला ३३ मते मिळवित विजयी झाले आहे. तर महाविकासआघाडी ३२ मते मिळाली आहे. जळगावच्या जिल्हा परिषदेत रंजना पाटील अध्यक्ष तर लालचंद पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. जळगावात जिल्हा परिषदेच्या विजयानंतर भाजप आणि रंजना पाटील यांच्या समर्थकांचा जोरदार जल्लोष पाहायला मिळला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा प्रत्येकी एक म्हणजे दोन सदस्य अपात्र आहेत.

कोल्हापूर आणि नाशिकची जिल्हा परिषदे भाजपच्या हातातून गेली. यानंतर भाजपला जळगावची जिल्हा परिषदेत पीछेहाट होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. आम्ही जर एकत्र असलो तर आम्हाला कोणी आव्हान नाही देऊ शकत, असे म्हणत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महाविकाआघाडीवर निशाणा साधला. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एका मतावरून पेच निर्माण झाला होता. यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया उद्या (४ जानेवारी) ढकलली आहे. शिवसेना बंडखोर उमेदवार आणि सेना कार्यकर्ते भिडले.  शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देवानिया यांची गाडी अडवली. औरंगाबादमधील तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

जळगाव जिल्हा परिषदेचे एकूण सदस्य – ६५

  • भाजप – ३३
  • राष्ट्रवादी – १५
  • शिवसेना – १३
  • काँग्रेस – ४

Related posts

पवारांची केंद्रावर टीका

News Desk

विहंग सरनाईक ईडीच्या कार्यालयात हजर

News Desk

मुख्यमंत्री आज ठाण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार

News Desk