Site icon HW News Marathi

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून ‘या’ पाच उमेदवारांची नावे

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने विधानपरिषदेसाठी प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपकडून प्रवीण दरेकर यांना पुन्हा एकाद विधानपरिषदेवर पाठवण्यात आले आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने पाच उमेदवारांची यादी दिली आहे. तर विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि नंदूरबारचा जिल्हा प्रमुख आमशा पडवी या दोघांची नावे जाहीर केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विधानपरिषदेसाठी कोणाची वर्णी लागेल. याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

दरम्यान, भाजपकडून विधानपरिषदेसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु, भाजपने विधानपरिषदेसाठी जाहीर केलेल्या यादी पंकजा मुंडेंचे नाव नसल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या हाती निराशा आली. पक्षाने पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांचे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.   विधानपरिषदेसाठी श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या दोन नव्या चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे. यामुळे पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना डावलले.

राम शिंदेंना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने कर्जत-जामखेडमधून तिकट दिले होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी राम शिंदेचा पराभव केला होता. विधानपरिषदेत प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांची सदस्यत्वाची मुदत संपली होती. आणि प्रवीण दरेकर हे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष नेता म्हणून प्रवीण दरेकरांनी महाविकासआघाडीची विधानपरिषदेत अनेकदा कोंडी केली. यामुळे त्यांची पुन्हा एकदा विधान परिषदेवर वर्णी लागली होती. राम शिंदे हे विधानपरिषदे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासकरून  रोहित पवारवर टार्गेट करण्यासाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याचे म्हटले जाते.

 

 

 

Exit mobile version