HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप हा उन्मादी पक्ष, जयसिंगराव गायकवाडांचा गंभीर आरोप

औरंगाबाद | भाजपला मराठाड्यामध्ये मोठा धक्का बसला असून पक्षाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपण पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि प्रदेश कार्यसमितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं पत्र गायकवाड यांनी राज्यातील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवलं आहे. गेली बारा वर्षे मी भाजप नेत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यांनी मला कोणतीही जबाबदारी दिली नाही व जवळही केले नाही.

राज्यातून औरंगाबादमध्ये येणारे नेते माझ्या घरासमोरून जात होते पण मला कोणीही साधे बैठकीला बोलावत नसतं. त्यामुळे पक्षात राहून काय करू, असा प्रश्न असे राजीनामा दिल्यानंतर गायकवाड लोकसत्ताशी बोलताना म्हणाले आहेत. इतकच नाही तर भाजपा हा उन्मादी पक्ष असून पदवीधर निवडणुकीमध्ये त्यांच्या उमेदवाराला हरवण्यासाठी काम करणार असल्याचे गायकवाड म्हणाले आहेत.

दरम्यान, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत दाखल केलेला अर्ज गायकवाड यांनी मंगळवारी मागे घेतला आहे. “भाजप हा उन्मादी पक्ष आहे. त्या पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणार असून राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण हे भाजपचा पराभव करू शकतील म्हणून त्यांच्या मागे कार्यकर्ते उभे करू,” असे गायकवाड म्हणाले. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासमवेत जयसिंगराव यांनी काम केले होते. रामदासांचे श्लोक म्हणत त्यांनी भाजपचा प्रचार केला होता.

“मी जयसिंगराव गायकवाड पाटील, भाजपच्या कार्यसमिती सदस्यत्वाचा व प्राथमिक सदसत्यत्वाचा राजीनामा देत आहे,” एवढा एका ओळीचा राजीनामा गायकवाड यांनी चंद्रकांत पाटील यांना पाठवला आहे. गायकवाड हे भारत सरकारमध्ये केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री होते. त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सहकार राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. याशिवाय ते मराठवाडा पदवीधर मतदारसंघामधून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते तर तीन वेळा बीडचे खासदार राहिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईडीकडे आमच्या नेत्यांचे पत्ते आहेत का? संजय राऊतांचा सवाल

News Desk

कल्याणराव, सगळ्यांना एकत्र करुन निर्णय घेऊ म्हणाले हा… पवारांचे मिश्किल उत्तर

News Desk

राष्ट्रवादीकडून राजू शेट्टींना विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर

News Desk