HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘अहमदनगर महापालिकेसाठी भाजपची जोरदार तयारी’, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत बैठक!

पुणे। अहमदनगर महापालिकेवर जूनमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झालीय. भाजपकडे महापौरपदासाठी उमेदवारच नव्हता. तर उपमहापौर पदासाठी भाजपनं रस दाखवला नाही. या पार्श्वभूमीवर आज अहमदनगरच्या भाजप पदाधिकाऱ्यांची आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पुण्यात महत्वाची बैठक पार पडली. भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील घरी ही बैठक पार पडली आहे.

भाजपची तयारी

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. नगर जिल्ह्यातील पक्षांतर्गत सर्व नाराजी, गटातटाचं राजकारण विसरुन आगामी महापालिका निवडणुकीला सामोरं जाण्यावर या बैठकीत चर्चा झाली. आमदार शिवाजी कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली भाजप अहमदनगर महापालिका निवडणूक लढवणार असल्याचं आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं आता तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे.

कोण-कोण होते उपस्थित

अहमदनगरचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौर मालन ढोणे यांना निरोप देताना अडीच वर्षात केलेल्या कामांचं भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रेझेंटेशन दिलं होतं. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता स्थापन झाली होती. मात्र पुन्हा योग जुळून आला तर पुढील काळात एकत्र येऊ. अहमदनगर शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन आघाडी करायला तयार आहोत, असं स्पष्ट मत सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं होतं. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा महापौर होणार का, अशाही चर्चा रंगली होती. त्यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप तसेच भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

भाजपमध्ये प्रवेश करणा-या १० आमदारांना शहांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

News Desk

आगमन बाप्पाचे | यंदा ‘चायना मेड’ सजावट साहित्याने दुकाने सजली

News Desk

रविवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मिळून २,०२० लोकल फेऱ्या सुरु होणार 

News Desk