HW Marathi
क्राइम मंत्रिमंडळ महाराष्ट्र राजकारण

भाजपच्या माजी नगरसेवकावर महिलेचे गंभीर आरोप

कल्याण | कल्याण मधील एका महिलेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, केडीएमसी माजी स्थायी सभापती आणि भाजपा माजी नगरसेवक संदीप गायकर यांनी सन 2019 ते 6 सप्टेंबर 2021 या काळात वेळोवेळी चार चाकी वाहनाने पाठलाग करून समाजात व नातेवाईकात बदनामी करेल , चेहऱ्यावर ऍसिड टाकून चेहरा खराब करेल , तुला सोडणार नाही, फिर्यादी महिला आणि मित्र परिवारास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ करत जबरदस्तीने हात पकडून विनयभंग करत न थांबता इंस्टाग्रामवर आणि वॉट्स ॲपवर अश्लील मेसेज टाकून बदनामी केल्याप्रकरणी केडीएमसी माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपा माजी नगरसेवक संदिप गायकर यांच्यावर विनयभंग केल्या प्रकरणी बाजरपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकिय वर्तुळात खळबळ माजली आहे

बाजारपेठ पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे

केडीएमसी माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपा माजी नगरसेवक संदीप एकनाथ गायकर यांच्याविरोधात एका महिलेने तक्रार केल्यानंतर गायकर यांच्या विरोधात विनयभंगाचा बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे . भाजप नगरसेवक संदीप गायकर यांच्या विरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंधित महिलेला अश्लील मेसेज पाठवले, तसंच धमकी दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे. याबाबत किरीट सोमय्या यांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी कुणी काही चूक केली असेल तर त्याच्या विरोधात कायद्यानुसार चौकशी आणि कारवाई झाली पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.

Related posts

इक्बाल कासकरला कारागृहात व्हीआयपी सेवा, ५ पोलीस कर्मचारी निलंबित

Gauri Tilekar

डी. के. जैन राज्याचे नवे मुख्य सचिव

‘सरकारकडे पैसे नसतील तर मंत्र्यांनी रोजगार हमी योजनेच्या कामावर जावे’

News Desk