HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या पुराव्यातील एकही कागद खोटा असेल तर…! किरीट सोमय्यांचं पवारांना मोठं आव्हान

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या हे सध्या पवार कुटुंबाविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरून थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच सवाल केला आहे. “अजित पवारांनी आपल्या बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे शरद पवारांना मान्य आहे का?” असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, यावेळी किरीट सोमय्या यांनी पवार कुटुंबीयांना एक मोठं आव्हानही दिलं आहे. “मी दिलेल्या पुराव्यातील कोणतंही कागदपत्र खोटं आहे हे पवार कुटुंबातील कोणीही हे सिद्ध करून दाखवावंच”, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

“जरंडेश्वर साखर कारखान्यापासून अजित पवार यांच्या ७० बेनामी संपत्ती, कंपन्यांमध्ये अजित पवारांच्या बहिणी, मेहुणे भागीदार आहेत. मग अजित पवारांनी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेशी बेईमानी केली की आपल्या बहिणींशी? आयकर विभागाची धाड पडल्यानंतर पहिल्याच दिवशी अजित पवार यांनी म्हटलं की ‘माझ्या बहिणींच्या घरी आयकराच्या धाडी कशाला? त्यांनी कोणताही आर्थिक गैरव्यवहार केलेला नाहीये.’ पण माझ्याकडे पुरावे आहेत”, असं किरीट सोमय्या म्हणाले.

एकही कागद खोटा असेल तर…!

“माझं शरद पवार यांना आव्हान आहे की मी हे सर्व पुरावे, सगळी कागदपत्रं आयकर विभागाला आणि सहकार मंत्रालयाला देखील पाठवणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे, यातला एकही कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी कोणीही मला हे सिद्ध करून दाखवावं”, असं मोठं आव्हान यावेळी किरीट सोमय्या यांनी पवारांना दिलं आहे. त्यामुळे, पवार कुटुंबियांकडून याला काय प्रत्युत्तर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

ठाकरे-पवारांमध्ये ‘हे’ म्हणण्याची हिंमत नाही!

“पवार परिवार महाराष्ट्राच्या जनतेला लुटण्याचं काम करत आहे. मी ती लूट जनतेसमोर ठेवण्यासाठी काम करतो आहे. शरद पवार इतके वर्ष मुख्यमंत्री राहिले, सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. ११ घोटाळेबाज ठाकरेंचे आता १७ घोटाळे झाले. हे आकडे वाढतच चालले आहेत. ठाकरे-पवारांमध्ये यातील एकही घोटाळा केलेला नाही असं म्हणण्याची हिंमत नाही”, असा दावाही यावेळी किरीट सोमय्यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलांपाठोपाठ वडिलांच्या ही हाती भाजपचा झेंडा

News Desk

‘…आता ठिणगी पडली, आमच्या नादाला लागू नका’ संजय राऊतांचा राष्ट्रवादीला गंभीर इशारा

News Desk

किरीट सोमय्या हे बेजबाबदार वक्तव्य करण्यास प्रसिद्ध आहेत त्यामुळे…

News Desk