HW News Marathi
महाराष्ट्र

आप्तेष्टांच्या लग्नात उदयनराजे-फडणवीसांची गळाभेट, तर राज ठाकरेंचीही उपस्थिती

नाशिक | काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली होती. या भेटीवरुन अनेक तर्क वितर्क लावले गेले होते. मात्र, या भेटीचं कारण हे उदयराजे भोसले यांनी राज ठाकरेंना आप्तेष्टांच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठीचे होते. दरम्यान, भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टांच्या विवाह सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. यावेळी उदयनराजेंनी फडणवीसांची गळाभेट घेतली. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते गिरीश महाजन, जयकुमार रावलही उपस्थित होते.

उदयनराजेंची फडणवीसांशी गळाभेट, पाहा व्हिडीओदरम्यान, या लग्न सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तर, उदयनराजे यांनी फडणवीसांची गळाभेट घेत त्यांना निरोप दिला होता. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपस्थितीती या लग्नाला लावली होती. त्यामुळे राजकीय वर्तृळात आणखी कोणता नवा ट्विस्ट येणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील पूरग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून ५ लाखांची मदत जाहीर!

News Desk

भीमा कोरेगाव दंगलीपूर्वी झालेला हल्ला हिंदू संघटनांनी केला होता ? समन्वय समितीचा अहवाल

swarit

देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड

News Desk