HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंना देशपातळीवर लाँच करून शिवसेनेचा फज्जा उडवला! – गोपीचंद पडळकर

मुंबई | जनाब संजय राऊत तुम्हाला उत्तर प्रेदश व गोवा येथील निवडणूकीत नोटा पेक्षाही कमी मत मिळाले आणि आदित्य ठाकरे यांना देशपातळीवर लाँच करून त्यांचा पार फज्जा उडविला. कदाचित ज्यापद्धतीने काकांनी राहुल गांधींना टोपन नाव मिळवून दिले. तशीच काही तुमची सुप्त इच्छा आदित्य बाबत दिसतेय, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. 

पडळकर पुढे म्हणाले, “राऊत तुमच्या माहिती करिता जेंव्हा लाल चौकात पाक आंतकवाद्यांनी ..कोई मा का लाल तिरंगा लहराके दिखाये अशा धमक्या देण्याचे पोस्टर्स लावले होते. त्यावेळेस  नरेंद्र मोदीजींनी धमक्यांना न जुमनता लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवला होता. जनाब राऊत अजूनही उर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतोय.”

“यावर कधीतरी एखादा लेख लिहा. जनाब राऊत तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहता पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात फिरवून दाखवा.. म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पंकजा मुंडे या फडणवीसांवर नाराज”, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

News Desk

बिहारच्या विषयावरुन शिवसेनेची भूमिका दुटप्पी – प्रविण दरेकर

News Desk

हुतात्मा अंभोरेंना परभणीकरांचा भावपूर्ण निरोप

News Desk