सांगली | पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अपयश आल्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सांगलीमध्ये सेनेनं भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेची वाट धरली आहे. मुंबईत ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत तासगावच्या नगरपालिका आणि पंचायत समितीच्या सभापतीसह खासदारांच्या शिलेदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का दिला असे मानले जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे भाजप खासदार संजयकाका पाटील आणि भाजपाला धक्का बसला आहे. होम ग्राऊंड असलेल्या तासगाव तालुक्यात खासदार संजय पाटील गटाला गळती लागली आहे. संजय पाटील यांचे कट्टर समर्थक आणि भाजपचे तासगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती जयवंत माळी आणि सावर्डेचे सरपंच प्रदीप माने यांनी खासदार पाटील आणि भाजपला सोडचिट्टी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.