Site icon HW News Marathi

UP मध्ये मराठी भाषा शिकवा; भाजपच्या ‘या’ नेत्याने योगींना लिहिले पत्र

मुंबई | महाराष्ट्रात परप्रांतीय येण्याचे जास्त आहे. यामुळे स्थानिक आणि परप्रांतीयमध्ये वाद होत असतात.  महाराष्ट्रात उत्तर भारतीय हे मोठ्या संख्येने नोकरीसाठी येतात.  या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात मराठी पर्यायी भाषा म्हणून शिकवण्याची विनंती करणारे पत्र भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिले आहे. कृपाशंकर सिंह यांच्या पत्रामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कृपाशंक सिंह यांनी पत्रात म्हटले, “मी गेल्या 50 वर्षापासून महाराष्ट्रात वास्तव्यास आहे. या 50 वर्षात माझ्या निदर्शनात आले की, उत्तर प्रदेशातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेले विद्यार्थी हे मोठ्या संख्येने महाराष्ट्रात येतात. परंतु, या मुलांना मराठी भाषा अवगत नसल्यामुळे खूप समस्येचा सामना करावा लागतो. तसेच महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहे. परंतु, उत्तर भारतीयांना मराठी भाषा अवगत नसल्यामुळे ते त्या संधीचा लाभ घेता येत नाही. यामुळे मी सांगू इच्छितो की, उत्तर प्रदेशात मराठी पर्यायी भाषा शिकवण्यात यावी. जर मराठी भाषा आली तर उत्तर भारतीयांना सरकारी नोकरी मिळवण्याचा मार्ग अधिक सोपा होईल, ” असे त्यांनी पत्रात म्हणाले.

मनसे सुरुवातीपासून उत्तर भारतीयांच्या विरोध केला आहे. राज्यातील भूमीपुत्रांना नोकऱ्यांना मिळाव्यात. यासाठी मनसेने आंदोलन केले होते. यावेळी मनसेने उत्तर भारतीयांना मारल्याची अनेक उदाहरण आहेत. आजही मनसे मराठीच्या भूमिकेवर ठाम आहेत.

 

 

 

 

 

Exit mobile version