HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिकमध्ये भाजपच्या ‘या’ नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट!

नाशिक | राज्यात सध्या निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना आता वेग येताना दिसत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर आहे. भाजपच्या नेत्याने हॉटेलमध्ये जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज ठाकरे कालपासून (५ मार्च) नाशिकमध्ये मुक्कामी आहे. पहिल्या दिवशी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर आज सकाळी भाजपचे शहर अध्यक्ष गिरीश पालवे भेटीसाठी पोहोचले. पालवे यांनी राज यांची भेट घेतली आणि चर्चा केली आहे. पालवे यांच्या भेटीमुळे मनसे भाजपला टाळी देणार का अशा चर्चांना अधाण आले आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये मनसेनं भाजपला मदत केली होती. त्यामुळे स्थायी समिती सभापती निवडणुकीत देखील मनसे भाजपला मदत करणार आहे का, असा सवाल निर्माण झाला आहे. आगामी महापालिका निवडणुका पाहता नाशिकमध्ये भाजप आणि मनसेत जवळीक वाढत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये मनसे भाजप युती होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मरकजमध्ये सहभागी झालेल्या १४०० पैकी फक्त ५० जण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

लॉकडाऊनमध्ये काळात राज्यात सायबरचे २२७ गुन्हे दाखल, महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती

News Desk

कोटक महिंद्रचे सीईओ यावेळी केवळ १ रुपये पगार घेणार !

News Desk