Site icon HW News Marathi

“महापुरुषांना जातीवरून वाटू नका”, पंकजा मुंडेंनी वादग्रस्त वक्तव्या करणाऱ्यांना खडेबोल सुनावले

मुंबई | “महापुरुषांना जातीवरून वाटू नका”, असे म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्यात महापुरुषासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे. पंकजा मुंडेंनी आज (12 डिसेंबर) गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने गोपीनाथ गडावरून कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडेंनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. सध्या राज्यातम महापुरुषांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यावर टीका केली आहे.

 

पंकजा मुंडे म्हणाल्या, “कुठे तरी आज मला एका मिडियाने प्रश्न विचारला की, राजकारण्यांनी बदलायची गरज आहे का?, माझे म्हणे आहे की, जेवढे राजकारणांनी बदलण्याची गरज आहे. तेवढे मतदारांनी सुद्धा बदलायची गरज आहे. पैशाच्या जिवावर राजकारण करायचे असते. तर कशामुळे चहा विकणाऱ्या माणसाचा मुलगा देशाचा प्रधानमंत्री झाला असता. पैशाच्या आणि ताकदीच्या जिवावर राजकारण करायचे असेल. तर तुमच्या लेकरांचे भविष्य धोक्यात आहे. आणि कृपा करू. महापुरुषांना जातीवरून वाटू नका. महात्मा फुलेंचे अमुक, छत्रपती शिवराय आमचे असे नका करू. आमचे छत्रपती शिवराय आहेत. आमच्यासारखे राजकारणी प्रत्येक संताला आणि प्रत्येक महापुरुषाला जातीवर विभागात आहेत. आणि त्यांना लहान करत आहेत. त्या महापुरुषांनी जाती रचना मोडीत काढण्यासाठी काम केले आहे.”

 

“परकीय आक्रमण नस्तनाबुत करण्यासाठी स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांनी तलवार उचलेली आहे. त्यांच्या सैन्यात नव्हते का सर्व जाती धर्माचे लोक. महात्मा फुलेंनी शिक्षण देताना काही विशिष्ट समाजाच्या शिक्षणासाठी आवाज उचलाला का?, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. तेव्हा त्यांनी विशिष्ट समाजासाठी घटना लिहिल काय?, या देशाचे लाल रक्त ज्याच्या अंगात आहे. त्या प्रत्येक माणसासाठी त्यांनी घटना लिहिलेली आहे”, असे सवाल पंकजा मुंडेंनी विचारले आहे.

 

महापुरुषांचे जातीवरून तुकडे करू नका

 

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, “आता पुन्हा कोणी म्हणे की, तीनच लोकांची नावे का घेतली. तर आणखी नावे का नाही घेतली, असे म्हणाऱ्यांना म्हणून देत. पण कृपा करून. महापुरुषांचे जातीवरून तुकडे करू नका.  ही मुंडेसाहेबांची शिकवण होती. भाजपमध्ये काम करत होते. भाजपचा एक विचार होता. मुंडेसाहेबांनी जिथे मी जन्मलो तोही विचार घेऊन पुढे जायाला पाहिजे. ओबीसी आरक्षणाचे बिल लोकसभेत मांडले की नाही. मराठवाड्यामध्ये नामांतराच्या चळवळीत सहभागी झाले. ज्या ज्या भूमिकांचा समर्थन त्यांना करायचे होते. त्या भूमिका पक्षाच्या व्यपतीत बसत नव्हते. तर त्या व्यपतीत बसवण्याचा प्रयत्न केला.@

 

 

 

 

Exit mobile version