HW News Marathi
महाराष्ट्र

मुंडे साहेबांपश्चात लोकांचं प्रेम तसूभरही कमी नाही – पंकजा मुंडे

पाथर्डी । “राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरत असून यापुढेही हा प्रवास असाच सुरू राहिल”, असं भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पाथर्डीत सांगितलं. पंकजा मुंडे म्हणाल्या, “पाथर्डीत मी बऱ्याच दिवसांनी आले. लोकं येण्याचा खूप आग्रह करत होते. पण कोरोना आणि गर्दीमुळे आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या लोकांना काही इजा होऊ नये म्हणून मनावर दगड ठेवून दूर राहिले. तथापि, आज आपण माझं जे उत्स्फूर्त स्वागत केलं ते पाहून भारावून गेले. मुंडे साहेबांच्या पश्चात आपलं प्रेम आणि विश्वास मला मोठी उर्जा देऊन जातो.”
“मुंडे साहेबांपश्चात लोकांचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही”, असं म्हणत पंकजांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. “सत्ता असताना आपण काय कामं केली हे सांगण्याची आज गरज आहे. सत्तेवर असताना लोकांच्या पायावर विकासाचा अभिषेक केला. मात्र आज सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांना कसलीच मदत मिळत नाही. आम्ही केलेल्या कामाचीच उदघाटनं आज होतात. आताच्या मंत्र्यांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा जनतेचं भलं करण्यात वेळ घालवावा”, असा टोलाही यावेळी पंकजांनी लगावला.

महाराष्ट्रभर फिरत राहणार!

“पंकजा मुंडे घरात बसल्या, संपल्या, निराश झाल्या, हरल्या, बाहेरच निघत नाहीत असं म्हणणा-यांनी फार मोठी चूक केली आहे. मी आता मोकळी आहे , जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत महाराष्ट्रभर फिरत आहे. परवाच पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड असा दौरा केला. मध्यप्रदेशातही प्रचाराला जाऊन माझं योगदान दिलं. यापुढेही हा प्रवास असाच चालू राहणार आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. “समोर बसलेल्या जनता जनार्दनाची संपती कधीही कमी होवू नये अशी प्रार्थना मी मोहोटादेवीच्या चरणी केली”, असं यावेळी पंकजांनी सांगितलं.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंनी गुन्हेगारांना पाठिशी घालू नये; संजय राऊतांचा निशाणा

News Desk

राज्यात आज ३,४२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

शिक्षकाने केला पत्नीचा खून

News Desk