HW News Marathi
महाराष्ट्र

माजी मंत्री आणि भाजप नेते संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन

चंद्रपूर | जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे यांचे आज (२५ एप्रिल) निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपूसन त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

संजय देवतळे यांना कोरोनाची लागण होण्यापूर्वी त्यांच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांची चाचणी करण्यात आली होती. तेव्हा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मागील सहा दिवसांपसून हे उपचार सुरु होते. मा६, आज अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले.

संजय देवताळे ४ वेळा काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासह राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाचा कारभारासुद्धा त्यांनी सांभाळला होता. त्यानंतर त्यांनी २०१४ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. यावेळी मात्र, त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २०१९ च्या निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. पुन्हा शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत देवतळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपत नुकताच प्रवेश केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अल्टिमेटमवर देश चालतोय का?, संजय राऊतांचा राज ठाकरेंना सवाल

Aprna

या देशातील कोणतीही तपासयंत्रणा म्हणजे परमेश्वराचा अवतार नसतो!

News Desk

बीडच्या स्थानिक आमदारामुळे अजित पवारांच्या उद्घाटन कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध

Aprna