HW News Marathi
महाराष्ट्र

नितेश राणेंनी BMC आयुक्तांना पत्र लिहून गिरगाव व्ह्यूइंग डेकची पुन्हा एकदा मागितली माहिती

मुंबई | गिरगाव चौपाटीवर कोस्टल रेग्युलेटरी झोन ​​(सीआरझेड) नियमांचे बीएमसीने उल्लंघन केल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आयुक्तांना पत्र लिहून त्याबाबत तपशीलवार माहिती मागवली आहे. त्यांनी अधिकार्‍याला माहिती सामायिक करण्याचा इशारा देखील दिला आहे अन्यथा ते विधानसभेत विशेषाधिकार भंग प्रस्ताव आणणार असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे. 

पत्रात नितेश म्हणातात “सुमारे ४७५ चौरस मीटरची व्ह्यूइंग गॅलरी. कोणतीही सीआरझेड परवानगी न घेता गिरगाव चौपाटीवर बी.आर.तांबे चौकाजवळ उत्तरेकडे बांधण्यात येत आहे. याचं डेकच्या खाली पर्जन्य जलववाहिका जी पावसाचे पाणी समुद्रात सोडणायाठी बांधलेली आहे. नितेश यांची आपल्या पत्रात माहानगर पालिका आयुक्तांना प्रश्न विचारला आहे की बीएमसीने सीआरझेड कायद्यांतर्गत कारवाई करणं अपेक्षित होत पण तसं अजून काही का केलं नाही ? हे बेकायदा बांधकामाबाबत मी यापूर्वी १ मे आणि ७ मे रोजी पत्र लिहिले होते. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

आयुक्तांना दिलेल्या तिसऱ्या स्मरणपत्रात राणे म्हणाले की, बीएमसीने आपल्याला आवश्यक असलेली माहिती तातडीने द्यावी. “मला माहिती वेळेत न दिल्यास मी विधीमंडळाच्या येत्या विधानसभेच्या अधिवेशनात विशेषाधिकार भंग प्रस्ताव मांडेन,” गिरगावात व्ह्यूइंग डेक बांधण्याची कल्पना बीएमसीने २०२१ मध्ये मांडली आणि त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये बांधकामाला सुरुवात झाली. सुमारे 500 लोकांना समुद्रकिनारा पाहण्याच्या सुविधेचा आनंद घेता आला. बीएमसीने चैत्यभूमीजवळ दादर चौपाटीवर आधीच असा एक डेक बसवला आहे आणि लवकरचं वरळीत देखील असा डेक बनविण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांनी भर पत्रकार परिषदेत लावला उपमुख्यमंत्र्यांचा तो व्हिडिओ

News Desk

ठाकरे कुटुंबियांकडून रोशनी शिंदेंची भेट; तब्येतीची केली विचारपूस

Aprna

“भल्या पहाटेही झालाच होता मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न”,राऊतांचा अजित पवारांना चिमटा

News Desk