HW News Marathi
महाराष्ट्र

मैत्रीला सीमांचं बंधन नसतं! सुजय विखे अन् पार्थ पवारांचा एकत्र विमान प्रवास

मुंबई । विखे आणि पवार कुटुंबामधील राजकीय वाद अवघा महाराष्ट्र जाणतो. पण, दोन्ही कुटुंबांच्या नव्या पिढीतील संबंधांवर याचे नकारात्मक परिणाम झाले नाहीत हे विशेष. याचीच प्रचिती काल (१६ ऑक्टोबर) पुन्हा एकदा आली आहे. अहमदनगरचे भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र तसेच राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी शनिवारी एकाच विमानातून प्रवास केला. यावेळी पार्थ पवारांमुळे प्रभावित झालेल्या सुजय विखेंनी त्यावेळचे फोटो आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले आहेत.
“मैत्रीला सीमांचं बंधन नसतं”, असं म्हणत खासदार सुजय विखे पाटील यांनी पार्थ पवार यांच्यासोबतचा हा फोटो शेअर केला आहे.
या पोस्टवर हजारो लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव झाला. दरम्यान, सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांची शनिवारी औरंगाबाद विमानतळावर भेट झाली. या दोघांनीही एकाच विमानाने औरंगाबाद ते मुंबई असा प्रवास केला. या विमान प्रवासादरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये छान गप्पा रंगल्या होत्या अशीही माहिती मिळते.
https://www.facebook.com/1437285613167585/posts/3101667316729398/

रोहित पवार आणि सुजय विखेंची मैत्री

विखे पाटील आणि पवारांचं राजकीय वैर जगजाहीर असताना त्यांच्या तिसऱ्या पिढीकडून मैत्रीचा नवा अध्याय लिहिला जात असल्याचं म्हटलं जातं. कारण, फक्त पार्थ पवारच नव्हे तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे दुसरे नातू तसेच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि सुजय विखे पाटील यांच्यातही घट्ट मैत्री असल्याचं पाहायला मिळालं आहे.

भाजपमध्ये पार्थ पवारांसाठी सॉफ्ट कॉर्नर?

पार्थ पवार हे जरी राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे नातू असले तरीही त्यांचे विचार मात्र तुलनेने वेगळे आणि काही प्रमाणात भाजपशी जवळीक साधणारे असल्याचं यापूर्वी घडलेल्या काही प्रसंगांमधून स्पष्ट दिसलं होतं. अशावेळी, “पार्थ पवारांना आम्ही किंमत देत नाही”, असं विधान एकीकडे खुद्द पचारांनी केलेलं असताना दुसरीकडे भाजपच्या बड्या नेत्यांनी मात्र पार्थ यांची चांगलीच पाठराखण केली होती. त्यामुळे, भाजपमध्ये पार्थ पवारांसाठी असलेला सॉफ्ट कॉर्नर स्पष्ट दिसून आला होता.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकर शिवसेनेला महापालिका निवडणुकीत जागा दाखवून देतील

News Desk

मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती आणि उपमुख्यमंत्र्यांची फक्त बारामतीपुरती, प्रकाश आंबेडकरांचा टोला

News Desk

ST विलीनीकरणाच्या अहवालावर आता पुढील सुनावणी शुक्रवारी होणार

Aprna