बुलडाणा | एका सर्व्हेच्या मधून सर्वात लाडके मुख्यमंत्री या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वोत्कृष्ट ठरले आहेत. यावरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. कोरोना काळात 14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? असा खडा सवाल भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. कोरोना काळात मुख्यमंत्री 14 महिने मंत्रालयात आले नाहीत. मात्र तरीही त्यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री कसे म्हणता? असं बावनकुळे म्हणाले आहेत.
तुम्ही मातोश्रीला घरी बसलेले आहेत, कायम घरीच बसा
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता तुम्ही मातोश्रीला घरी बसलेले आहेत, कायम घरीच बसा, असा हल्लाबोल राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला. हे सरकार आहे तरी कुठे, जनतेने या राज्यात भाजपचं सरकार यावं, मुंबई महापालिका आम्ही जिंकावी, मुंबई जगातील सुंदर, पर्यटन, आरोग्यदायी शहर बनवण्याची क्षमता फक्त भाजपमध्ये आहे, अशी जनतेची भावना आहे. शिवसेनेचा आशिर्वाद आम्हाला नको, महागात पडेल, त्यांचा रोखीचा आशिर्वाद असतो, अशी खिल्ली नारायण राणे यांनी उडवली आहे.
13 राज्यांमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंबर वन ठरले
प्रश्नमकडून देशातील 13 राज्ये निवडण्यात आली होती. त्यात बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. या 13 राज्यांमध्ये देशातील एकूण लोकसंख्येच्या 67 टक्के लोक राहतात. या सर्वेक्षणात नुकत्यात विधानसभा निवडणुका पार पडलेल्या तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि आसामचा समावेश नाही. तर आंध्र प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये पॅनेल नसल्यामुळे या राज्यांचाही सर्वेक्षणात समावेश करता आला नसल्याचं सांगितण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरेंना 49 टक्के मतं
या सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. 49 टक्के मतदारांनी उद्धव ठाकरे यांची कामगिरी चांगली असल्याचं मत नोंदवलं आहे. त्यांच्यापाठोपाठ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना 44 टक्के मतं मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आहेत. त्यांना 40 टक्के मतं मिळाली आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.