HW News Marathi
महाराष्ट्र

बुडत्या जहाजाचे ‘कप्तान’ कोण होईल! – चंद्रकांत पाटील

मुंबई | “बुडत्या जहाजाचे कप्तानशिप कोण होईल,” असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल (३ एप्रिल) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले. यूपीएचे नेतृत्व करण्यात मला रस नसल्याचे स्पष्ट केले. शरद पवारांनी देखील काल सकाळी कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे गुढपाडव्याच्या दिवशी झालेले भाषण हे हिंदुना आनंद देणार होते. त्यांच्या भाषणाचे मी स्वागत करतो. आपल्या देश हा हिंदूचा आहे. आपल्या देशात मुस्लिम आक्रमण करून आले आहेत. त्यामुळे अजान होत असेल तर हिंदुची आरतीसुद्धा झाली पाहिजे. जातीय तेढ निर्माण होईल, यामुळे हिंदू दाबला गेल्याचे त्यांनी आधोरेखित केले.” 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरेंनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे म्हणत शरद पवार त्यांना सभा घ्यायला लावल्या होता, असा आरोप करत चंद्राकांत पाटलांनी भाजप बी टीम घेऊन निवडणुक लढवते पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये ऑनलाइन पद्धतीने पैसे वाटप केले जात असून जे पैसे वाटप करत आहेत. त्यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागेल, असा धमकी वजा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अ कृषी जमिनीसाठीची अट शिथिल

News Desk

मुंबई महापालिका म्हणजे यशवंत जाधव प्रा. ली. कंपनी आहे काय?, भाजपचा सवाल

News Desk

महाविकासआघाडी सरकारकडून मंत्र्यांची प्रकरणं दाबली जातात, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

News Desk