HW News Marathi
महाराष्ट्र

‘तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरणारा मी नाही’, भाजपकडून हसन मुश्रीफांना चोख उत्तर

कोल्हापूर | भाजप नेते किरीट सोमैया यांनी काल(१३ ऑगस्ट) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ईडी तक्रार करणार असल्याचं सांगितलं होतं. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी सोमैयांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. हसन मुश्रीफ यांच्या धमक्यांना मी घाबरत नाही, त्यांनी अशा धमक्या गल्लीतल्या कार्यकर्त्यांना द्याव्यात असा जोरदार निशाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर साधला. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाबाबत आपल्याला काहीही माहित नाही, तरीही केवळ विषयाला वेगळे वळण देण्यासाठी मुश्रीफ यांनी त्या प्रकरणात आपले नाव घेतल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

जनता माझ्यासोबत

संमार्जित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “मंत्री मुश्रीफ यांनी पैरा फेडण्याच्या केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारले असता श्री. घाटगे म्हणाले, अश्या गल्लीतल्या धमक्यांना मी घाबरत नाही. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या रक्ताचा वारस व स्व विक्रमसिंह राजे घाटगे यांचा मी चिरंजीव आहे. आणि जर घाबरत असतो तर अपक्ष म्हणून निवडणूक तुमच्या विरोधात लढलो नसतो.

जनता माझ्यासोबत असल्यामुळे मला ९० हजार मते मिळाली. या बाबत सुद्धा जनताच त्यांना उत्तर देईल. सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना थेट उत्तर न देता त्यांनी माझे व चंद्रकांत दादा यांचे नाव घेऊन राजकारण केले आहे .मी मात्र त्यांच्यावर कधीही टीका केलेली नाही. ते मात्र सतत माझ्यावर टीका करत असतात. याचा अर्थ माझे नाव घेतल्याशिवाय त्यांचे राजकारण होत नाही.

मानहानीचा दावा आणि हत्तीवरून मिरवणूक

हसन मुश्रीफ यांनी किरि सोमैयांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यावर देखील घाटगे यांनी भाष्य केलं आहे. “मुश्रीफ यांना असा इशारा देण्याची सवय आहे. मानहानीचा दावा आणि हत्तीवरून मिरवणूक ही त्यांची कायमची वक्तव्ये आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र खंडपीठ काढावे लागेल”, अशी टीका त्यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही घरं सोडू नका, मी वरिष्ठांशी बोलतो”, राज ठाकरेंनी दिले पोलीसांच्या पत्नींना आश्वासन

News Desk

सामना अग्रलेख – ‘वाधवान’ प्रकरण शिजले नाही !

News Desk

SEBC मधून अ‍ॅडमिशन न घेता त्याऐवजी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेता येईल – अशोक चव्हाण

News Desk