Site icon HW News Marathi

भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

मुंबई | भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे निधन झाले आहे. गिरीश बापट यांची प्रकृती खालविल्यानंतर आज (29 मार्च) त्यांना पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात (Mangeshkar Hospital) दाखल करण्यात आले होते.  गिरीश बापट यांची वयाच्या 72 व्या वर्ष अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपूर्वी गिरीश बापट यांनी कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता.

गिरीश बापट यांनी रुग्णलयात दाखल केल्यानंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच डॉक्टर हे गिरीश बापट यांत्यांच्या प्रकृतीचे मेडिलक बुलेटिक जाहीर करतील असे रुग्णालयाने सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट हे दीर्घ आजाराने त्रस्त होते. गिरीश बापट यांच्या पार्थिवार आज सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. गिरीश बापट यांच्या निधनाची बातमी कळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.   गिरीश बापट यांनी आज अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट यांनी 1973 सालापासून राजकारणात सक्रिय झाले होते. गिरीश बापट यांनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम देखील केले होते.

गिरीश बापट यांचा अल्पपरिचय

गिरीश बापट हे टेल्को कंपनीत 1973 मध्ये कर्मचारी म्हणून काम करत होते. त्यादरम्यान कामगार संघटनेतून गिरीश बापट यांनी राजकारणात प्रवेश केला होता. तर गिरीश बापट हे 1983 साली पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1993 मध्ये कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर 1995 पासून गिरीश बापट सलग पाच वेळा आमदार म्हमून विजयी झाले होते. तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात देखील गिरीश बापट यांनी म्हत्वाच्या खात्यांचे मंत्री राहिले होते तर पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्याचबरोबर गिरीश बापट हे 2019 मध्ये पुण्यातून खासदार म्हणून निवडून आले होते.

 

 

 

 

 

Exit mobile version