HW News Marathi
महाराष्ट्र

कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू

मुंबई । बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अडचणीत आलेल्या कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणादरम्यान अत्यंत चर्चेत आलेल्या पंच प्रभाकर साईल याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील, ही अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी असल्याचे मानले जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, शुक्रवारी (१ एप्रिल) दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे निधन झाले आहे. आज (२ एप्रिल) सकाळी ११ वाजता त्याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरीतील त्यांच्या घरी आणले जाईल. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील.

प्रभाकर साईल हा ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला झालेल्या अटकेदरम्यान प्रचंड चर्चेत आलेल्या आणि तिथे उपस्थित असलेल्या किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता. तसेच तो या ड्रग्ज प्रकरणातील पहिल्या क्रमांकाचा पंच होता. ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर प्रभाकर साईल याने एक व्हिडिओ पोस्ट करत अत्यंत मोठे दावे केले होते. त्यामुळे तो प्रचंड चर्चेत आला होता. 

क्रूझ ड्रग्ज प्रकरण सुरू असताना प्रभाकर साईलने आपल्या संरक्षणाची मागणी मुंबई पोलिसात धाव घेतली होती. माझ्या जीवाला धोका आहे. मला समीर वानखेडेची भीती वाटतेय. मला संरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी एनसीबीचा पंच प्रभाकर साईल मुंबई पोलिसांत गेला होता.

आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींचा सौदा होणार होता. मात्र १८ कोटींची डील झाली. त्यातील ८ कोटी समीर वानखेडेला आणि उरलेले पैसे इतरांमध्ये वाटून घेण्याचे किरण गोसावीचे संभाषण ऐकल्याचे प्रभाकर साईलने आपल्या व्हिडिओतून सांगितलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

Aprna

मालपाणी कमवण्याकरता ‘हे’ सर्व लोक एकत्र आले आहेत !

News Desk

सातारच्या गादीचा अपमान सहन करणार नाही,उदयनराजेंच्या समर्थनार्थ शंभूराजे मैदानात !

News Desk